काय सांगता! नागपूरमध्ये दीड लाखांचा लाकडी बैल, बाजारात सर्वत्र त्याचीच चर्चा

Last Updated:

नागपूरच्या बाजारात तब्बल दीड लाखांचा लाकडी बैल विक्रीसाठी आलाय.

+
News18

News18

नागपूर, 14 सप्टेंबर : भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय संस्कृतीतील बहुतांश सण-उत्सव हे शेतीशीच निगडित आहे. काळाच्या ओघात आज सर्वच क्षेत्रात प्रगती झाली तशी ती शेतीमध्येही झाली. त्यानंतरही शेतात राबणारा बळीराजाचा सच्चा साथीदार म्हणून बैलांचा वापर हा सर्वाधिक होत असतो. वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बैलाच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस राखीव असून तो दिवस बैल पोळा या सणाच्या रूपाने सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
पोळ्याच्या दिवशी बैलाची आकर्षक सजावट, पूजा आणि पंचपक्वान्नचा नेवेद्य देत बैलाबद्दल श्रद्धा अर्पण केली जाते. विशेषतः विदर्भात पोळा हा सण दोन साजरा करतात. ज्यामध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लाकडी बैलांचा तान्हा पोळा साजरा केला जातो. याच तान्हा पोळ्याच्या निमित्याने नागपुरातील बाजारपेठा सजल्या असुन एका नंदीची चांगलीच चर्चा सध्या बाजारात रंगलीय.
advertisement
नागपुरच्या महाल भागात फार मोठा लाकडी बैलांचा बाजार भरतो. या ठिकाणी यवतमाळहून आलेल्या एक कारागिराने चक्क साडे सहा फूट उंच असलेल्या बैल विक्रीसाठी आणला आहे. या नंदीची किंमत तब्बल दीड लाख ठेवण्यात आली असून हा बैल बघण्यासाठी बाजारात चांगलीच गर्दी होत आहे.
advertisement
काय आहे खासियत?
या बैलाची विशेष बाब म्हणजे हा बैल तयार करतांना तो एकाच लाकडावर कोरकाम करण्यात आले असून सुबक असा सहा फुटाचा नंदीबैल बनविण्यात आला. कलाकाराने याच्यावर मोठ्या प्रमाणात कलाकारी केली. अगदी हुबेहूब वाटावा असा हा साडेसहा फूट उंचीचा नंदीबैल आहे.
advertisement
जीवंत बैलाच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने याची किंमत जास्त आहे. मात्र हा बैल इतका आकर्षक आहे की तो सगळ्यांचे मन मोहून घेत आहे. हा बैल तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला आहे. एका सलग लाकडापासून हा नंदीबैल बनविण्यात आला असून त्याला लाकडाचे पॉलिश लावण्यात आल्यामुळे चकाकी आली आहे.गेल्यावर्षी साडेतीन लाखाचा बैल तयार करण्यात आला होता. यंदा बाजारात हा सर्वात मोठा नंदी असून त्याला 1 लाख 20 हजार पर्यंत मागणी केली मात्र आम्हाला परवडत नसल्याने मी तो दिला नाही. यावर्षी योग्य किंमत मिळेल असा विश्वास आहे असे मत बैलाचे कारागीर फरान शेख यांनी व्यक्त केले.
advertisement
विदर्भातील पोळ्याचं महत्त्व
विदर्भात पोळा हा 2 दिवस साजरा केला जातो. ज्यामध्ये पोळ्याच्या दिवशी मोठ्या बैलांचा मोठा पोळा तर दुसऱ्या दिवशी लाकडी बैलांचा तान्हा पोळा. याचा दिवशी जगात केवळ नागपुरात निघणारी मारबत हा सण देखील साजरा केला जातो.हा उत्सव बघण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात नागरिक येत असतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
काय सांगता! नागपूरमध्ये दीड लाखांचा लाकडी बैल, बाजारात सर्वत्र त्याचीच चर्चा
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement