शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पोळा सणाचे काय आहे पौराणीक महत्त्व? कधी करावी बैलांची पूजा?

Last Updated:

शेतात राबनाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचे पौराणिक महत्व काय आहे ? पाहा

+
News18

News18

नागपूर, 13 सप्टेंबर : भारतीय संस्कृतीतील बहुतांश सण हे शेतीशी निगडित आहे. त्यातीलच एक प्रमुख सण म्हणजे पोळा हा होय. वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबनाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र याच सणाचे काही पौराणिक महत्त्व देखील आहे. विशेषतः विदर्भात लाकडी आणि मातीच्या बैलांची जोडी मोठ्या श्रध्देने पुजली जाते. या सणाचे पौराणिक महत्व काय? बैलांची कश्या पद्धतीने पूजा केली जाते आणि पूजनाचा मुहूर्त काय याविषयी नागपुरातील ज्योतिष शास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद डॉ. भूषण यांनी माहिती दिली आहे.
पोळा सणाचे पौराणिक महत्त्व?
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही देशातील बहुतांश लोक हे शेती किंवा शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहे. तर अनेकांसाठी शेती हाच उपजीविकेचा एक प्रमुख स्त्रोत आहे. वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बळीराजाच्या संगतीला बैलांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान असते. याच बैलांच्या कष्टाला स्मरून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पूजनाचा दिवस समर्पित आहे त्यालाच आपण पोळा असे म्हणतो.
advertisement
लाकडी नंदीची निघतेय मिरवणूक, 150 वर्षांची परंपरा असणारा तान्हा पोळा माहितीये का?
पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र याच पोळा या सणाचे उल्लेख वेदात देखील आले आहे. विष्णू देवाने धरतीवर येण्यासाठी कृष्णाच्या रूपाने जन्म घेतला. कालांतराने कृष्णाला मारण्यासाठी कंसाने अनेक प्रयत्न केले त्यात अनेक राक्षसांचा देखील समावेश होता. त्यातीलच एक राक्षक म्हणजे पोलासूर हा होय. पोलासूर राक्षसाचा वध करण्यासाठी एक दिवस श्रीकृष्णाने निवडला तो दिवस होता श्रावण अमावस्येचा या श्रावण अमावस्येला कृष्णाने पोलासूर राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून पोळा हा सण पोलासूर या राक्षसाच्या वधा नंतर सर्वत्र ओळखला जातो.
advertisement
मृग नक्षत्र लागल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीच्या कामाला गती प्राप्त होत असते. नांगरणी पेरणी इत्यादींसारखे कामे आटोपल्या नंतर आपल्या सहयोगी म्हणून बैला प्रति आदररूपाने कृतज्ञता आणि श्रद्धा अर्पण करण्यासाठी पोळा हा दिवस समर्पित आहे. या दिवशी सकाळी नदीवर किंवा अन्यत्र बैलाला स्नान करून त्याची सजावट केली जाते. पाठीवर रंगबिरंगी झोपेदार झूल, हिंगणा रंगरंगोटी,पायात घुंगरू, गळ्यात माळ, घंटा, असा एकंदरीत साज करून शेतकरी मोठ्या गाजावाजा करत बैलाचे पूजन करत असतो. यावेळी सुवासिनीकर्वी औक्षवंन करून बैलाला पंचपकवानाचा नैवेद्य दाखवण्यात येत असतो. तर गावात घरोघरी पूजनाचा कार्यक्रम होत असतो. पद्धतीने बैलाचे पूजन केला जाते,अशी माहिती ज्योतिर्वेद भूषण यांनी दिली.
advertisement
आता नाशिकमध्येच घ्या केदारनाथ दर्शन, अंजनेरी पर्वतरांगेत आहे हे ठिकाण
अलीकडच्या काळात प्रत्येकाकडे बैल असेलच असे नाही प्रामुख्याने शहरांमध्ये ही उणीव दिसून येते. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी तिथे बैल पोचले जातात. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीत बैलांप्रती श्रद्धा आणि आदरभाव निर्माण व्हावा या हेतूने बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोळा हा उत्सव साजरा केला जातो. बैलपोळा किंवा तान्हा पोळा हे उत्सव सामाजिक उत्सव असल्यामुळे कुठलाही मुहूर्त बघून पूजा करण्याची आवश्यकता नाही. दिवसभर कधीही आपण बैल पूजनाचा कार्यक्रम करू शकतो अशी माहिती ज्योतिर्वेद डॉक्टर भूषण यांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पोळा सणाचे काय आहे पौराणीक महत्त्व? कधी करावी बैलांची पूजा?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement