Video : 'देवेंद्रजींनी चालवले...'; अमृता फडणवीसांचा नवा उखाणा ऐकलात का? विरोधकांना लगावला जोरदार टोला

Last Updated:

Amrita Fadnavis Ukhana Video : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उखाणा घेतला आहे, या उखाण्यातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीसांचा नवा उखाणा
अमृता फडणवीसांचा नवा उखाणा
नागपूर, उदय तिमांडे प्रतिनिधी : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उखाणा घेतला आहे, या उखाण्यामधून त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. नागपूरमध्ये आयोजित एका हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हा उखाणा घेतला आहे. या उखाण्यातून त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम चर्चेमध्ये असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी घेतलेल्या मराठी उखाण्यामुळे (Marathi Ukhane) त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपल्या उखाण्यातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीनं दक्षिण- पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी हा उखाणा घेतला आहे.  " देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वान, आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण" असा उखाना अमृता फडणवीस यांनी घेतला आहे.
advertisement
दरम्यान यावेळी अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांशी देखील संवाद साधला. उपस्थित महिलांनी अमृता फडणवीस यांना गाणं गाण्याचा अग्रह केला. अमृता फडणवीस यांनी गाणं देखील गायलं. यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं महिलांसाठी अशा अनेक योजना आणल्या आहेत, ज्यामुळे महिलांना समाजात सन्मानानं उभं राहण्याची संधी मिळाली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Video : 'देवेंद्रजींनी चालवले...'; अमृता फडणवीसांचा नवा उखाणा ऐकलात का? विरोधकांना लगावला जोरदार टोला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement