वारंवार केबिनमध्ये बोलवायचा अन्.., नागपुरातील प्रसिद्ध रुग्णालयात डॉक्टर तरुणीसोबत अश्लील प्रकार

Last Updated:

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) मध्ये कार्यरत असलेल्या न्यायवैद्यक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
नागपूर: नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) मध्ये कार्यरत असलेल्या न्यायवैद्यक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्याविरोधात विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका निवासी महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी डॉ. व्यवहारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

२७ वर्षीय तक्रारदार महिला डॉक्टर मेयो रुग्णालयात न्यायवैद्यकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत आहे. तक्रारीनुसार, विभाग प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे हे तिला वारंवार एकटीला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन करत होते. डॉ. व्यवहारे यांच्या या वर्तनामुळे त्रस्त झालेल्या महिला डॉक्टरने सुरुवातीला रुग्णालयाच्या वरिष्ठ प्रशासनाकडे याबद्दल तक्रार दिली. मात्र, प्रशासनाकडून तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप तक्रारदार डॉक्टरने केला आहे.
advertisement

वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने पोलीस ठाण्यात धाव

रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने आणि छळ थांबत नसल्याने अखेरीस महिला डॉक्टरने थेट नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन गाठून डॉ. व्यवहारे यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने डॉ. व्यवहारे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

विशाखा समितीचाही छळावर ठपका

दरम्यान, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'विशाखा समिती'नेही आपला अहवाल सादर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा समितीने डॉ. व्यवहारे यांनी तक्रारदार महिला डॉक्टरचा छळ केल्याचा ठपका ठेवला आहे. समितीने आपल्या अहवालात डॉ. व्यवहारे यांची तातडीने बदली करण्याची शिफारस देखील केल्याचे समजते. या गंभीर प्रकरणामुळे मेयो रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
वारंवार केबिनमध्ये बोलवायचा अन्.., नागपुरातील प्रसिद्ध रुग्णालयात डॉक्टर तरुणीसोबत अश्लील प्रकार
Next Article
advertisement
Maharashtra Winter Session: १३० किलो मटण,  ६००० अंडी,  आमदार, पोलिसांसाठी भन्नाट मेन्यू! आमदार निवास कँटीनमध्ये रोज काय बनतं?
आमदार, पोलिसांसाठी भन्नाट मेन्यू! आमदार निवास कँटीनमध्ये रोज काय बनतं?
  • आमदार, पोलिसांसाठी भन्नाट मेन्यू! आमदार निवास कँटीनमध्ये रोज काय बनतं?

  • आमदार, पोलिसांसाठी भन्नाट मेन्यू! आमदार निवास कँटीनमध्ये रोज काय बनतं?

  • आमदार, पोलिसांसाठी भन्नाट मेन्यू! आमदार निवास कँटीनमध्ये रोज काय बनतं?

View All
advertisement