advertisement

फिरती बस घडवेल अंतराळाची सफर, 'इस्रो'ची खास बस विदर्भाच्या दौऱ्यावर, Video

Last Updated:

इस्रोची एक खास बस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. ही 'स्पेस ऑन व्हिल्स’ फिरती बस अंतरीक्षची सफर घडवणार आहे.

+
फिरती

फिरती बस घडवेल अंतराळाची सफर, 'इस्रो'ची खास बस विदर्भाच्या दौऱ्यावर, Video

नागपूर, 17 ऑगस्ट: आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही जमिनीवरून दिसणारे चंद्र, सूर्य, ग्रह, असंख्य लुकलुकनारे तारे आणि एकूणच अंतराळाचे साऱ्यांनाच कायम कुतूहल राहिले आहे. याच अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सर्वसामान्यांनासह विद्यार्थांना व्हावी, या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने 'स्पेस ऑन व्हिल्स’ ही अनोखी फिरती बस तयार केली आली आहे. या बसमध्ये चंद्रयान मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्रोचा एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विद्यार्थ्याना पहायला मिळणार आहे. सध्या ही बस नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या प्रवासाला निघाली आहे.
विद्यार्थ्यासाठी मोठी पर्वणी
नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये खगोल विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे. इस्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या 'मिशन मंगळ, चंद्रयान-2 मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती या बसमध्ये चित्रफितीतून देण्यात येत आहे. त्यात रॉकेट कसे उडते? रॉकेटवर सॅटेलाईट कसे असेंबल केले जाते? आणि अंतराळात सोडले जाते, त्यांचे सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण टेक्निकल माहिती येथे विद्यार्थ्यांना मिळेल. 15 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैदराबादचे संचालक जी. श्रीनिवास राव यांच्या उपस्थितीत या अंतरिक्ष बसचे उद्घाटन झाले.
advertisement
अशी असेल विदर्भवारी
'स्पेस ऑन व्हिल्स’ ही बस सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शाळेत पोहोचेल. त्यांनतर ती विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यामध्ये प्रवास करेल. ही बस प्रत्येक जिल्ह्यात किमान 15 दिवस फिरणार असून अधिका अधिक विद्यार्थांपर्यंत बस घेऊन जाण्याचा मानस आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही बस आल्यावर तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शाळांनी या अंतरिक्ष बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाचे सचिव नरेश चाफेकर यांनी केले आहे.
advertisement
विज्ञान भारतीचा उपक्रम
अंतराळ दर्शनासह विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा, पोस्टर मेकिंग, वादविवाद स्पर्धा, ई-लोकेशन, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जाणार आहे. विज्ञान भारतीसोबत गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारानुसार इस्रोच्या आऊटरिच कार्यक्रमाची जबाबदारी विज्ञान भारतीने घेतली आहे. त्या माध्यमातून ही अंतरीक्ष बस देशभर फिरविली जात आहे. या बसला आतपर्यंत विद्यार्थ्यासह नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती चाफेकर यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
फिरती बस घडवेल अंतराळाची सफर, 'इस्रो'ची खास बस विदर्भाच्या दौऱ्यावर, Video
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement