पावसाने विश्रांती घेतल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता, पाहा विदर्भात कधी कोसळणार पावसाच्या सरी
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
विदर्भात गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाहा कधी येणार पाऊस..
नागपूर, 17 ऑगस्ट: विदर्भात गेल्या आठवड्याहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसाने सरप्लसवर गेलेल्या पावसाच्या सरासरीत घसरन दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विदर्भात पावसाने अचानक घेतलेल्या विश्रांतीने धरणातील पाणीसाठा घटण्याची भीती असून विदर्भातील अनेक भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आगामी काळात पावसाचा अंदाज कसा असेल हे जाणून घेऊया.
विदर्भातील पावसाची स्थिती
विदर्भात आत्तापर्यंत 566.2 मिलिमीटर पाऊस झाला आहे. काही दिवसांपासून हीच नोंद सरप्लस होती. मात्र पावसाने दांडी मारल्याने त्यात किंचितही वाढ झालेली नाही आणि त्यात सरासरी 5-8 टक्क्यांनी पातळी घाटली असल्याचे चिन्ह आहे. जून ते ऑगस्ट पर्यंत सरासरी 596.5 मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. जिल्हा निहाय विचार केल्यास नागपुरात पाऊस सरासरीपेक्षा पाच ते सात टक्क्यांनी खाली घसरला आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा सध्या तरी सामान्य स्थितीत आहेत पण पाऊस झाला नाही तर त्यात घसरण होण्याची भीती आहे, असे डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितले.
advertisement
पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण कमी
पश्चिम विदर्भातील अकोला व अमरावतीतील स्थिती ही धोकादायक झाली असून पाऊस अनुक्रमे सरासरी 22 व 26 टक्क्यांनी घसरला आहे. केवळ यवतमाळ सुस्थितीत आहे. मात्र आगामी काळात पाऊस झाला नाही तर पुढील स्थिती चिंताजनक असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी 17-18 तारखेनंतर विदर्भात पावसाची शक्यता आहे. पाऊस लांबल्याने तापमानातही मोठी वाढ झाली आहे. दिनांक 16 ऑगस्ट रोजी वर्धातील 33 अंश सेल्सिअस हे तापमान विदर्भातील सर्वाधिक तापमान मानले गेले आहे.
advertisement
आज पावसाची शक्यता
विदर्भात आगामी 17 ऑगस्ट रोजी सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दिनांक 18 ऑगस्ट रोजी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती या ठिकाणी पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज नागपूर प्रादेशिक विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे नागपूरसह अनेक जिल्ह्यात उकाडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना देखील पावसाची प्रतीक्षा करत आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 17, 2023 2:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
पावसाने विश्रांती घेतल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता, पाहा विदर्भात कधी कोसळणार पावसाच्या सरी