मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणातील एका वाक्यानं तरुणीला मिळाली प्रेरणा, शिकागोमध्ये यश
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूरच्या शहाना फातिमाने अमेरिकेतील इल्लिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT, शिकागो) या आघाडीच्या संस्थेमध्ये आपल्या प्रतिभेची छाप पाडत मोठं यश मिळावलं.
महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच करणारी घटना घडली. या घटनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रेरणा मिळाल्याचं तरुणीनं सांगितलं. त्यांची वाक्य ऐकली आणि क्षणात निर्णय पक्का झाला. नागपूरच्या शहाना फातिमाने अमेरिकेतील इल्लिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT, शिकागो) या आघाडीच्या संस्थेमध्ये आपल्या प्रतिभेची छाप पाडत मोठं यश मिळावलं. या विद्यापीठातील सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड झाली. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल तिची ही निवड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणा देणारी आहे.
शहाना सध्या सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी या विषयात मास्टर्स करत असून, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि पायाभूत सुरक्षा डिझाइन या क्षेत्रात तिने उल्लेखनीय प्रकल्प राबवले आहेत. २०२४ मध्ये तिला शैक्षणिक गुणवत्तेसाठी विशेष सन्मान मिळाला आहे. शहानाने या क्षेत्रात जाण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी नागपूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमातून घेतला.
त्या कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ''काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, एक काळ असा होता की जेव्हा ज्या राष्ट्रांकडे इंधनाचे मोठे साठे होते ते समृद्ध होते. पण आता ज्यांच्याकडे डेटाचे साठे असतील ते समृद्ध होतील. हे ऐकून या क्षेत्रात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली असं शहानाने सांगितलं. ''
advertisement
यशात सिंहाचा वाटा डॉ. रिजवान अहमद यांचा असल्याचंही तिने सांगितलं त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झालं असं ती म्हणाली. त्यांनी तिला सायबर सुरक्षेच्या सखोल संकल्पना, डिजिटल फॉरेन्सिक्सचे महत्त्व आणि जागतिक करिअर संधी यांचे प्रभावी प्रशिक्षण दिले. शहानाची ही कहाणी केवळ नागपूरकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. सायबर सुरक्षेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतातील विद्यार्थी जागतिक स्तरावर चमकू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
May 21, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणातील एका वाक्यानं तरुणीला मिळाली प्रेरणा, शिकागोमध्ये यश


