advertisement

नागपूर ते बेंगळुरू प्रवास 2 तासात, एअर इंडियाची एक्स्प्रेस सेवा, पहिलं उड्डाण कधी?

Last Updated:

Nagpur News: नागपूरहून एअर इंडियाची एक्स्प्रेस सेवा सुरू होत आहे. 180 जणांना घेऊन लवकरच विमान झेपावणार आहे.

Air India Express: नागपूर ते बेंगळुरू प्रवास 2 तासात, एअर इंडियाची एक्स्प्रेस सेवा, पहिलं उड्डाण कधी?
Air India Express: नागपूर ते बेंगळुरू प्रवास 2 तासात, एअर इंडियाची एक्स्प्रेस सेवा, पहिलं उड्डाण कधी?
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेंगळुरूसाठी आता प्रवाशांना आणखी एक लो-कॉस्ट पर्याय उपलब्ध होणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस 1 डिसेंबरपासून नागपूर-बेंगळुरू दरम्यान सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा उड्डाणे सुरू करत आहे. फक्त तीन दिवसांत या नव्या फ्लाइट्सना प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 60 टक्क्यांहून अधिक तिकिटांची बुकिंग पूर्ण झाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
180 प्रवासी क्षमतेचे विमान 
या सर्व उड्डाणांसाठी एअर इंडिया एक्स्प्रेस 180 प्रवासी क्षमता असणारे विमान वापरणार आहे. लो-कॉस्ट कॅरिअर असल्याने विशेषतः आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांना आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. बेंगळुरू ही आयटी सिटी असल्याने नागपूर आणि संपूर्ण विदर्भातून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या नव्या सेवांमुळे प्रवासाचा खर्च कमी आणि वेळ व्यवस्थापन अधिक सुखकर होणार आहे.
advertisement
दिवसभरात चार उड्डाणे 
नव्या वेळापत्रकानुसार आयएक्स-2097 ही सकाळची फ्लाइट बेंगळुरूहून 7.25 वाजता सुटून 9.30 वाजता नागपुरात उतरणार आहे. त्यानंतर परतीचे आयएक्स-2098 उड्डाण नागपूरहून 10 वाजता टेक-ऑफ होऊन 12.05 वाजता बेंगळुरूत पोहोचेल.
संध्याकाळच्या सेवेत आयएक्स-2793 बेंगळुरूहून 6.30 वाजता रवाना होऊन 8.35 वाजता नागपुरात लँड होईल. परतीचे आयएक्स-2794 उड्डाण रात्री 9.05 वाजता नागपूरहून सुटून 11.10 वाजता बेंगळुरूत पोहोचणार आहे.
advertisement
इंडिगोला कठीण स्पर्धा
नागपुरात आधीपासूनच बेंगळुरूसाठी इंडिगोची सेवा उपलब्ध आहे. मात्र एअर इंडिया एक्स्प्रेसची अधिक सोयीस्कर टायमिंग व कमी खर्चाच्या सेवांमुळे इंडिगोला आता स्पर्धेला सामोरे जावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या नव्या चार उड्डाणांनंतर नागपूर विमानतळावरील एकूण दैनिक उड्डाणांची संख्या 52 वर पोहोचली आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ग्राऊंड हँडलिंगची जबाबदारी एआयएएसएलकडे असणार असून पहिल्या उड्डाणासाठी विमानतळ प्रशासन आणि प्रवाशांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नागपूर-बेंगळुरू या व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मार्गावरील वाढलेली कनेक्टिव्हिटी आता अधिक वेगवान आणि परवडणारी ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
नागपूर ते बेंगळुरू प्रवास 2 तासात, एअर इंडियाची एक्स्प्रेस सेवा, पहिलं उड्डाण कधी?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement