Tiger Attack: महाराष्ट्रातील 'या' मार्गावरून जाताना सावधान! वाहन चालकांवर वाघिण करतेय हल्ला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Tiger Attack: आपल्या बछड्याच्या निधनानंतर वाघीण आक्रमक झाली असून महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर हल्ले करत आहे. नुकतेच एक दुचाकीस्वार या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
नागपूर: कुठल्याही आईला सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे तिचं बाळ. आपलं बाळ डोळ्याने दिसत नाही. कुठे असेल? कसं असेल? त्याच्याबरोबर काही वाईट घडलं असेल का? ही काळजी प्रत्येक आईला असते. अशीच एक आई आपल्या बाळाच्या विरहात आक्रमक झाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘के-मार्क’ नावाने ओळखली जाणारी वाघीण आपल्या बछड्याच्या निधनानंतर अक्षरशः आक्रमक झाली आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांवर ही वाघीण झडप घालत आहे. त्यामुळे केसलाघाट परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
दुचाकीवर झडप, युवक गंभीर जखमी
ही वाघीण तीन बछड्यांसह या भागात वास्तव्य करत होती. तिच्या अधिवासातूनच राष्ट्रीय महामार्ग जात असला, तरी गेल्या अनेक महिन्यांत तिने मानवी वाहनांवर कधीही हल्ले केले नव्हते. मात्र, गेल्या चार दिवसांत तिचा स्वभाव पूर्णतः बदलल्याचे वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. दोन दिवसांपूर्वी या वाघिणीने महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवर झडप घातली. या घटनेत खांबाळा येथील नागेश गायकी गंभीर जखमी झाले. यानंतर वाहनचालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
advertisement
बछड्याच्या विरहात वाघीण संतप्त
वाघिणीचे तीन बछडे होते. मात्र आता तिच्या सोबत फक्त दोन बछडेच दिसत आहेत. हरवलेला बछडा महामार्गावरील अपघातात मृत पावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपल्या बछड्याचा शोध घेण्याची धडपड आणि त्याच्या विरहातील अस्वस्थता यामुळे वाघीण संतप्त होऊन वाहनांवर हल्ला करत असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
advertisement
दरम्यान, रस्त्यांलगत सापडलेल्या बछड्याच्या अवशेषांचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या गोरेवाडा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. डीएनए अहवाल आल्यानंतर बछड्याच्या ओळखीची अधिकृत पुष्टी होणार आहे, अशी माहिती वनविभागाने दिली आहे. या घटनेनंतर परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर केसलाघाट परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळेत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 26, 2025 1:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Tiger Attack: महाराष्ट्रातील 'या' मार्गावरून जाताना सावधान! वाहन चालकांवर वाघिण करतेय हल्ला


