पोरालाच कॉपी द्यायला शाळेत घुसला नायब तहसीलदार, पकडल्यावर पोपटासारखा लागला बोलू, VIDEO

Last Updated:

संत भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज तनपुरवाडी येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.

News18
News18
अहिल्यानगर : दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या राज्यात सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवत आहे. मात्र या अभियानाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या एका नायब तहसीलदारांनीच काळ फासला आहे. या पठ्ठाने आपल्या मुलासाठी थेट परीक्षा केंद्रावर जाऊन कॉपी पुरवण्याचा प्रताप समोर आला आहे. एवढंच नाहीतर जेव्हा कर्मचाऱ्यांनी या तहसीलदाराला पकडलं तर त्यांच्याशीच अरेरावी करत होता.
advertisement
संत भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज तनपुरवाडी येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.  अनिल तोडमल  असं या नायब तहसीलदाराचं नाव आहे. अनिल तोडमल हे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदारावर कार्यरत आहे. त्यांच्या मुलाचं परीक्षा केंद्र हे संत भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज  आहे. आपण तहसीलदार असल्याचा आव आणत तोडमल हे थेट  लेकराला कॉपी पुरवण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले. परीक्षा सुरू झाल्यापासून तोडमल या परीक्षा केंद्रावर उपस्थित असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कॉलेजमध्ये येऊन नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना ताब्यात घेतलं. जेव्हा त्यांची चौकशी सुरू केली तेव्हा आपण तर मुलाला सोडायला आलो होतो, अशी बोलबच्चनगिरी सुरू केली.
advertisement
शिक्षण विभागाने फिर्याद दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे. तर, परीक्षा केंद्रावर कुणाला येण्यास मनाई असते असं असतानाही या नायब तहसीलदाराला कुणी येऊ दिलं, या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे.
advertisement
मात्र या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी हे वर्षभर शाळेत येत नसतात. या ठिकाणी फक्त परीक्षा घेण्यासाठी कॉलेजचा वापर होत असतो, असाही अजब आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्ह्यामध्ये अशा अनेक शाळा आणि कॉलेज आहेत. त्या फक्त परीक्षा केंद्र म्हणून वापरल्या जातात. यामध्ये शिक्षण विभाग आणि शिक्षण संस्थाचालक यांच्यामध्ये संगनमत असल्याचं बोललं जात आहे. आजच्या या प्रकारात महसूलचे अधिकारीच जर अशा प्रकारे त्यांच्या मुलांना कॉपी पुरवत असतील तर शासनाने कॉपी मुक्त परीक्षा हे अभियान राबवलेच कशाला? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरालाच कॉपी द्यायला शाळेत घुसला नायब तहसीलदार, पकडल्यावर पोपटासारखा लागला बोलू, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement