जुन्या वादाची किनार, मित्रांनीच मित्राचा काटा काढला, नालासोपारा हादरलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान मंदिरासमोर मित्रांमध्ये जुन्या झालेल्या वादात शुभम मिश्रा याची चाकूने भोसकून हत्या झाली.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात रात्रीच्या वेळी एका 30 वर्षीय तरुणाचा मित्रांनीच खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे . याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य रस्त्याच्या बाजूलाच ही हत्या करण्यात आली असून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पोलिसांची पथके असतात. मात्र यावेळी गस्त घालणारे पोलीस कुठे गेले होते असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र नालासोपारा पोलिसांनी याबाबत कॅमेरासमोर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
आधी चाकूने भोसकले, नंतर डोक्यात दगड घातला
नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान मंदिरासमोर मित्रांमध्ये जुन्या झालेल्या वादात शुभम मिश्रा याची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या एसटी डेपो रोड हनुमान मंदिराच्या चाकूने भोकसून आणि डोक्यात दगड मारून हत्या झाली असून मयत हा नालासोपारा पूर्वेच्या गाला नगर परिसरातील राहणारा होता.
advertisement
दोन्हीही आरोपी फरार, आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून ही हत्या मद्यपानाच्या नशेत झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हत्या करणारे दोन्हीही आरोपी फरार असून आरोपींना शोधण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
उच्च प्रतीचे कॅमेरे उपलब्ध नसल्याने तपासात अडथळे
नालासोपारा शहरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. तपासादरम्यान पोलिसांना अनेकदा तांत्रिक मदत, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, सर्वच ठिकाणी उच्च प्रतीचे कॅमेरे उपलब्ध नसल्याने तपासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शहरात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त, हाय-रेझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. यामुळे आरोपींचा लवकर शोध घेणे सोपे होईल आणि पोलिसांना तपासात प्रभावी मदत मिळू शकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 9:15 PM IST









