advertisement

दादा गेले, राज्य हळहळतंय अन् बारामतीत NCP ऑफिसात बर्थडे सेलिब्रेशन! Video व्हायरल होताच महिला अध्यक्षांचा राजीनामा!

Last Updated:

शारदा प्रांगणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

News18
News18
पुणे : बारामती येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात एका महिलेचा वाढदिवस साजरा केल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही आठवड्यांचाच कालावधी उलटलेला असताना शारदा प्रांगणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून पक्षाच्या शिस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेनंतर बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठविला आहे. मात्र या राजीनाम्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे समजते. निधनाला अवघे काही आठवडेच झाले असताना वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार अयोग्य असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
advertisement

अनिता गायकवाड यांनी का दिला राजीनामा? 

अनिता गायकवाड या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होत्या. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तरीही त्यांचे शहर महिला अध्यक्षपद कायम ठेवण्यात आले होते. आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement

काय म्हणाल्या अनिता गायकवाड?

दरम्यान, अनिता गायकवाड यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. घडलेल्या कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे. मला दादांच्या आशीर्वादाची गरज होती म्हणून मी शहर महिला अध्यक्षांना माझा वाढदिवस पक्ष कार्यालयात साजरा करण्याची विनंती केली होती. या घटनेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करते, असे देखील त्या म्हणाल्या.
advertisement

दिलगिरी व्यक्त करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न

एकीकडे संवेदनशील काळात झालेल्या या प्रकारामुळे नाराजी व्यक्त होत असताना, दुसरीकडे दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही या घटनेमुळे बारामतीतील राजकारण तापले असून, पुढील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादा गेले, राज्य हळहळतंय अन् बारामतीत NCP ऑफिसात बर्थडे सेलिब्रेशन! Video व्हायरल होताच महिला अध्यक्षांचा राजीनामा!
Next Article
advertisement
एका निर्णयाने मार्केटमध्ये सोन्याचा 'ब्लास्ट', किमतींनी ओलांडली धोक्याची पातळी; चांदीही चमकली, 5.8 टक्क्यांची भरारी
एका निर्णयाने मार्केटमध्ये सोन्याचा 'ब्लास्ट', किमतींनी ओलांडली धोक्याची पातळी
  • शेअर बाजार विसरा, आता फक्त सोनं!

  • मार्केटमध्ये गोल्डचा 'ब्लास्ट'

  • गुंतवणूक करण्याची हीच वेळ?

View All
advertisement