T20 World Cup : 10 वाजून 16 मिनिटांनी वाजणार पाकिस्तानचे बारा... सुपर-8 चा एकही बॉल न खेळता वर्ल्ड कपमधून पॅकअप!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाने खेळ खराब केला आहे. सुपर-8 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होत आहे.
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजला सुरूवात झाली आहे, पण सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाने खेळ खराब केला आहे. सुपर-8 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होत आहे, पण 7 वाजता सुरू होणारा सामना पावसामुळे अजूनही सुरू झालेला नाही, तसंच डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे आता ओव्हरही कमी व्हायला सुरूवात झाली आहे. रात्री 10 वाजून 16 मिनिटांपर्यंत पहिला बॉल पडला नाही, तर हा सामना रद्द केला जाईल.
पाकिस्तानचा गेम ओव्हर?
पावसामुळे पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातला सामना रद्द झाला तर दोन्ही टीमना 1-1 पॉईंट दिला जाईल. तसंच दोन्ही टीमचा नेट रनरेटही शून्य राहिल, त्यामुळे सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंडला त्यांचे उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तान-न्यूझीलंडचे सुपर-8 मधले उरलेले दोन सामने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहेत. या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात जरी पाकिस्तान किंवा न्यूझीलंडचा पराभव झाला तर त्यांचे जास्तीत जास्त 3 पॉईंट होऊ शकतात. या परिस्थितीमध्ये श्रीलंका आणि इंग्लंडने त्यांचे 3 पैकी 2 सामने जिंकले तरी ते 4 पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
advertisement
प्रेमदासावर शेवटचा सामना
पाकिस्तान यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधले त्यांचे सामने श्रीलंकेमध्ये खेळत आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरचा न्यूझीलंडविरुद्धचा पाकिस्तानचा हा शेवटचा सामना आहे. प्रेमदासाची खेळपट्टी ही स्पिन बॉलिंगला मदत करणारी आहे, तसंच पाकिस्तानच्या टीममध्ये स्पिनर्सची संख्याही जास्त आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान त्यांचे उरलेले दोन्ही सामने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले स्टेडियमवर खेळेल, जिथली खेळपट्टी ही बॅटिंगसाठी चांगली मानली जाते, त्यामुळे पल्लेकेलेमध्ये मोठा स्कोअर व्हायची शक्यता जास्त आहे. पल्लेकेलेची ही खेळपट्टी पाकिस्तानसाठी अडचणीची ठरू शकते.
advertisement
सुपर-8 स्टेजमध्ये 8 टीमना 4-4 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप 1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या टीम आहेत. तर ग्रुप-2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड आहेत. दोन्ही ग्रुपमधल्या टॉपच्या 2-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सेमी फायनलमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 9:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 10 वाजून 16 मिनिटांनी वाजणार पाकिस्तानचे बारा... सुपर-8 चा एकही बॉल न खेळता वर्ल्ड कपमधून पॅकअप!









