नुकसान भरपाई द्या, कार मालकाने ५ मुजरांना २ दिवस गॅरेजमध्ये डांबून ठेवलं, नांदेडची घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
माझ्या गाडीचे झालेले नुकसान भरून दे, असे म्हणत एका कार चालकाने मजुरांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येथे कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. कारची नुकसान भरपाई देण्याची मागणी करत कार मालकाने पाच मुजरांना दोन दिवस गॅरेजमध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
ट्रॅक्टरमधील सर्व पाच मजूर मध्य प्रदेश राज्यातील बौतुल जिल्ह्यातले रहिवाशी आहेत. शेतीच्या कामासाठी ते आले होते. काम न मिळाल्याने ते परत पुन्हा मध्य प्रदेशाकडे निघाले होते. रस्त्यात घडलेल्या अपघातानंतर त्यांना दोन दिवस गॅरेजमध्ये डांबून ठेवण्यात आले.
नेमकी घटना काय?
दोन दिवसांपूर्वी भोकर फाटा येथील एका पेट्रोल पंपाजवळ त्याच्या ट्रॅक्टरचा आणि कारचा अपघात झाला. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र नुकसान भरपाईची मागणी करत कार मालकाने पाच मजुरांना दोन दिवस डांबून ठेवले. त्यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे फार आरडाओरड न करता ते तिथेच बसून राहिले.
advertisement
आज अर्धापूर पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी पाच मजुरांची सुटका केली खरी पण मजुरांना डांबून ठेवण्याचा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्धापूर पोलीसांकडून हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कामगारांनी केला आहेत.
भरपाई दिली नाही तर सोडणार नाहीडांबून ठेवलेल्या मजुरांनी न्यूज १८ लोकमतशी आपबीती सांगितली
आमची काहीच चूक नव्हती. अपघातात कार मालकाचीच चूक होती. तरीही त्याने आमच्या गाडीची चावी काढून घेतली. त्याने आम्हा ५ जणांना दोन रात्री आणि एक दिवस गॅरेजमध्ये डांबून ठेवलं. आम्हाला त्यांनी मारहाण केली नाही. पण भरपाई दिली नाही तर सोडणार नाही, अशी धमकी त्यांनी आम्हाला वारंवार दिली, अशी आपबीती डांबून ठेवलेल्या मजुरांनी 'न्यूज १८ लोकमत'शी बोलताना सांगितली.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
April 12, 2025 3:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नुकसान भरपाई द्या, कार मालकाने ५ मुजरांना २ दिवस गॅरेजमध्ये डांबून ठेवलं, नांदेडची घटना