तीन पोरी मित्रांसमवेत लॉजवर, भावाला खबर, तिथे पोहोचल्यावर वेगळंच कांड, एकाला भोसकले, नांदेडची थरारक घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nanded Crime: महाविद्यालयीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत लॉवर गेल्याची खबर एका तरुणीच्या भावाला कळाली आणि त्याने लॉजवर जाऊन सगळ्यांना रंगेहात पकडले.
मुजीब शेख, प्रतिनिधी, नांदेड : महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आपापल्या मित्रांसह लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागली. भावाने बहिणीला लॉजवर रंगेहात पकडले. मात्र भावाला पाहिल्यानंतर तरुणीने थेट पहिल्या मजल्यावरून उडी मारली. तसेच तिच्यासोबत असलेल्या मित्राला भोसकण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडला.
नेमकं प्रकरण काय?
अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन तरुणी महाविद्यालय तृतीय वर्षात शिकतात. 21 जुलै रोजी कॉलेज संपल्यानंतर दुपारी तीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत दुचाकीवरुन तामसा रोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली. अल्पवयीन भाई आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहचला. त्याने बहिणीला आणि सत्ताजी भरकड याला एका खोलीत रंगेहाथ पकडले. दोघांमध्ये वाद झाला. घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारून पळ काढला. यात तिचा एक हात मोडला.
advertisement
अल्पवयीन पोराने बहिणीच्या मित्राला भोसकले
दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी सत्ताजी मरकड याला लॉजमधून बाहेर खेचून आणले. भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करुन पोटात खंजर भोसकले. यात सत्ताजी मरकड गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकमेकांविरोधात तक्रारी, पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू
advertisement
दरम्यान 21 जुलै रोजी कॉलेज संपल्यानंतर सत्ताजी मरकड , नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिघींना दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि सत्ताजी मरकड याने अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सत्ताजी मरकडसह तिघांवर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे सत्ताजी मरकड याच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
July 23, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तीन पोरी मित्रांसमवेत लॉजवर, भावाला खबर, तिथे पोहोचल्यावर वेगळंच कांड, एकाला भोसकले, नांदेडची थरारक घटना