Nanded Mahapalika Reservation: नांदेड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, ओबीसीची एक जागा कमी, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
निवडणूक आयोगाने चुकीचे निकष लावून ओबीसीची एक जागा कमी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. या आरक्षण सोडती विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेनेने ठाकरे गटाकडून देण्यात आला.
मुजीब शेख, प्रतिनिधी, नांदेड : नांदेड महापालिकेच्या एकूण ८१ सदस्यपदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. एकूण ८१ सदस्यांपैकी विविध प्रवर्गातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. एकूण ८१ जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५ जागा (एससी), अनुसूचित जमातीसाठी २ (एसटी), नागरिकांचा मागास प्रवर्गांसाठी (ओबीसी) २१ आणि सर्वसाधारण ४३ जागा राखीव करण्यात आल्या.
गत निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी २२ जागा होत्या. यावेळी मात्र २१ जागा करण्यात आल्या. निवडणूक आयोगाने चुकीचे निकष लावून ओबीसीची एक जागा कमी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. या आरक्षण सोडती विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेनेने ठाकरे गटाकडून देण्यात आला.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शकानुसार आरक्षण सोडत पार पडल्याचे आयुक्तांनी सांगितले. ओबीसीचे आरक्षण काढताना अपूर्णांक आला तर तो दुर्लक्षित करावा अश्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. ओबीसीची २१. ८७ खास प्रमाण आलेला आहे . त्यामुळे ८७ अपूर्णांक दुर्लक्षित करुन २१ जागा आरक्षित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. या सोडती बाबत आक्षेप , हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतरच आरक्षण सोडत अंतिम केली जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
advertisement
नांदेडमध्ये काँग्रेस-वंचितची आघाडी
नांदेडमध्ये काँगेस आणि वंचितच्या आघाडी झालेली आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडीची घोषणा केली. सद्या नगर परिषदेसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेत असल्याचे दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीबाबत नंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
November 11, 2025 3:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded Mahapalika Reservation: नांदेड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, ओबीसीची एक जागा कमी, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित?


