Nanded: ५ लाख हुंडा ठरला, ४ लाख दिले, १ लाखासाठी लग्नाच्या अवघ्या १२ दिवसात विवाहितेची हत्या, कुटुंबियांचा आरोप

Last Updated:

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड हुंडाबळी घटना
नांदेड हुंडाबळी घटना
मुजीब शेख, नांदेड : लग्नाच्या अवघ्या १२ दिवसात विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये घडली आहे. विवाहितेच्या मृत्यूनंतर हुंड्यासाठी विष पाजवून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील ताऊबाई चव्हाण हिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडी येथील सुधाकर राठोड याच्याशी झाला होता.
गेल्या आठवड्यात ७ तारखेला नवविवाहिता माहेरी आली. पुन्हा ८ तारखेला लगोलग नवविवाहिता सासरी गेली. ९ तारखेला मुलीला उलट्या होत असल्याचा फोन माहेरी आला. सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हैद्राबादला हलविण्यात आले. उपचारादरम्यान १३ जुलै रोजी नवविवाहितेचा मृत्यू झाला.
advertisement
हुंड्यासाठीच मुलीला विष पाजवून मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. एकूण ६ लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. ५ लाख रुपये हुंडा लग्नात देण्यात आला होता. पण एक लाख रुपयासाठी विष पाजून मुलीची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खून आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपी पतीसह सासू, सासरे अशा चौघांना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजन्यात आले का? की तिने स्वतः विष प्राशन केले? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: ५ लाख हुंडा ठरला, ४ लाख दिले, १ लाखासाठी लग्नाच्या अवघ्या १२ दिवसात विवाहितेची हत्या, कुटुंबियांचा आरोप
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement