Nanded News : नांदेडमध्ये लिंबाच्या झाडात अवतरली गणरायाची मूर्ती, दर्शनासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी
- Published by:Prashant Gomane
- Written by:Mujeeb Shaikh
Last Updated:
एकंदरीत सगळेच गणपतीच्या आगमनाच्या तयारीत सर्व मग्न झाले आहेत. असे असतानाच तिकडे नांदेडमध्ये लिंबूच्या झाडात गणराया अवतरले आहेत. ही घटना कळताच ग्रामस्थांनी लिंबाच्या झाडाजवळ एकच गर्दी केली आहे.
Nanded News : मुजीब शेख, नांदेड : येत्या 27 सप्टेंबर 2025 पासून गणेशोत्सवाला सूरूवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी आतापासून बाजारात घराघरांमध्ये आणि मंडळांमध्ये लगबग सूरू झाली आहे. एकंदरीत सगळेच गणपतीच्या आगमनाच्या तयारीत सर्व मग्न झाले आहेत. असे असतानाच तिकडे नांदेडमध्ये लिंबूच्या झाडात गणराया अवतरले आहेत. ही घटना कळताच ग्रामस्थांनी लिंबाच्या झाडाजवळ एकच गर्दी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर जवळगाव येथे लिंबाच्या झाडाला गणपतीच्या मुर्तीसारखा आकार आला आहे. त्यामुळे लिंबाच्या झाडावर गणराया अवतरल्याची चर्चा आहे. गावातील शंकर पवार यांच्या शेतातील झाडावर अशाप्रकारे गणराया अवतरले आहेत.त्यामुळे लिंबाच्या झाडावरील ही गणरायाची मुर्ती बघायला ग्रामस्थांनी एकच गर्दी केली आहे.
गावातील शंकर पवार यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर ही गणेश मुर्ती अवतरली आहे. तसेच ही मुर्ती एकदंत गणपती सारखी दिसते आहे.त्यामुळे गावातील नागरीकांनी या झाडाखाली गणपतीची मुर्ती ठेवून पुजापाठ सूरू केला आहे. काही ग्रामस्थांनी तर या झाडावर रंगरांगोटी देखील केली आहे.जेणेकडून गणपतीचे रूप उठून दिसेल. तसेच या झाडाची पूजा देखील सूरू आहे.
advertisement
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आता आजूबाजूच्या गावातील नागरीकांनी देखील या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी परिसरात एकच गर्दी केली आहे. त्यामुळे हा गणपती आकर्षण ठरतोय. विशेष म्हणजे गणपतीच्या आगमनाआधीच गणराया झाडात अवतरल्याने ग्रामस्थ प्रचंड खूश आहेत आणि गावातही आनंददायी वातावरण आहे.
बऱ्याचदा आपण मिरची, वांगे, बटाटा, नारळ आदीमध्ये गणेशाची प्रतिकृती आपण पाहिली आहे. पण आता नांदेडमध्ये लिंबाच्या झाडात गपणती अवतरले आहेत. याआधी जळगावच्या पाचोऱ्यात देखील अशाचप्रकारची घटना घडली होती. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात असलेल्या लिंबाच्या झाडावर बाप्पा अवतरले होते. त्यामुळे या घटनेचीही चर्चा रंगली होती.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
August 12, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded News : नांदेडमध्ये लिंबाच्या झाडात अवतरली गणरायाची मूर्ती, दर्शनासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी