आजूबाजूला जंगल, जंगलाजवळ गांजाची लागवड, पोलिसांना टीप मिळाली अन् 'कार्यक्रम झाला!'

Last Updated:

गोपनीय माहितीच्या आधारावर हिमायतनगर, इस्लापूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.

नांदेड- गांजा कारवाई
नांदेड- गांजा कारवाई
मुजीब शेख, प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील जंगलालगतच्या शेतीत गांजाची शेती होत असल्याची टीप पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी जवळपास ४५ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवनी आणि झळकवाडी दरम्यान जंगलालगतच्या शेतीत गांजाची शेती आढळून आली. इस्लापूर पोलिसांनी धाड टाकून गांजा जप्त केला. तुरीच्या शेतात लपवून ठेवलेली 40 ते 45 किलोपर्यंतची गांजाची झाडे उपटून पोलिसांनी ताब्यात घेतली.
गांजा कारवाईच्या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांची कारवाई तूर्त सुरू आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर हिमायतनगर, इस्लापूर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिवणी आणि झळकवाडी ही गावे तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहेत. तेव्हा इथे तेलंगणातून गांजा विक्री आणि मागणी होत असते? का याचा तपास सुरू आहे. या कारवाईत महसूल विभाग आणि नांदेड येथील फॉरेन्सिक पथक सहभागी झाले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
advertisement

शिरपूरमध्ये एक लाख स्क्वेअर फुटापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केली होती, पोलिसांचा छापा अन्...

वनजमिनीवर अवैधरित्या गांजाची शेती करणाऱ्यांविरोधात धुळे जिल्ह्यातील शिरपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शिरपूर तालुक्यातील जामण्यापाणी शिवारासह बभळाज वनशेत्र परिसरात शिरपूर ग्रामीण पोलिसांनी छापा ताकत तब्बल एक कोटी सहा लाख रुपयांची गांजाची झाड जप्त केली आहेत.
advertisement
शिरपूर तालुक्यातल्या वन विभागाच्या वनक्षेत्रांमध्ये अवैधरित्या गांजाची लागवड केली जात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने सापळा रचत ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी सुमारे एक लाख स्क्वेअर फुटापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या तब्बल एकवीसशे किलो गांजासह सुमारे एक कोटी सहा लाख रुपयांचा गांजा जाळून नष्ट केला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या गांजाची लागवड करून तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजूबाजूला जंगल, जंगलाजवळ गांजाची लागवड, पोलिसांना टीप मिळाली अन् 'कार्यक्रम झाला!'
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement