मुलगा होण्यासाठी सतत त्रास, मारहाण, गर्भवतीने नको ते पाऊल उचललं, नांदेडमध्ये हळहळ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
स्कुल व्हॅनसाठी माहेरावरून पाच लाख रूपये आणण्यासाठीही सातत्याने त्रास देण्यात आला.
मुजीब शेख, प्रतिनिधी, नांदेड : पहिली मुलगी झाल्याने दुसऱ्यांदा मुलगीच व्हावी यासाठी दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड शहरातील विठ्ठल नगरमध्ये ही घटना घडली.
हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी प्रतीक्षा भोसले हिचा २०२३ मध्ये नांदेडमधील लक्ष्मण भोसले याच्याशी विवाह झाला होता. मार्च २०२४ मध्ये प्रतीक्षाला मुलगी झाली. पण मुलगा पाहिजे म्हणून प्रतीक्षाला त्रास देण्यास सुरुवात झाली.
कानात औषध टाकत नसल्याने मारहाण
स्कुल व्हॅनसाठी माहेरावरून पाच लाख रूपये आणण्यासाठीही सातत्याने त्रास देण्यात आला. पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर मारहाणीमुळे एकदा प्रतीक्षाचा गर्भपात झाला. तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर तिला एका वैद्याकडे नेऊन मुलगा व्हावा यासाठी उपचार सुरू करण्यात आले. पण कानाला त्रास असल्याने कानात टाकायचे वैद्याने दिलेले औषध प्रतीक्षा टाकत नव्हती. त्यामुळे पतीने तिला मारहाण केली.
advertisement
तीन नणंदांचा त्रास, फोनवरून धमकी आणि शिवीगाळ
मुलगा व्हावा यासाठी तीन नणंदा देखील त्रास द्यायच्या. फोनवरून धमकी आणि शिवीगाळ करायच्या. या सर्व त्रासाला कंटाळून प्रतीक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतीक्षाच्या वडिलांच्या तक्रारी वरून या प्रकरणी पती लक्ष्मण भोसले आणि तीन नणंदांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 4:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलगा होण्यासाठी सतत त्रास, मारहाण, गर्भवतीने नको ते पाऊल उचललं, नांदेडमध्ये हळहळ









