Nanded News: डीजे लावलेल्या गाडीचे ब्रेक अचानक फेल; कार्यक्रमात बसलेल्या 12 लोकांना चिरडलं

Last Updated:

कार्यक्रमाच्या ठिकाणी डीजेही लावण्यात आला होता. मात्र, अचानक डीजे लावलेल्या बोलेरो गाडीचे ब्रेक फेल झाले.

गाडीने कार्यक्रमात बसलेल्या लोकांना चिरडलं (प्रतिकात्मक फोटो)
गाडीने कार्यक्रमात बसलेल्या लोकांना चिरडलं (प्रतिकात्मक फोटो)
मुजीब शेख, नांदेड 16 सप्टेंबर : अपघात कसे, कधी, कुठे आणि कोणासोबत होतील हे कोणीही सांगू शकत नाही. रस्त्यावर नेहमी सावध राहावं असा सल्ला आपल्याला दिला जातो. कारण इथे तुमची चूक नसतानाही कधी कोणती गाडी अनियंत्रित होऊन अंगावर येईल, हे सांगता येत नाही. मात्र, हे सगळं फक्त रस्त्यावरच घडतं असं नाही. अनेकदा तुम्ही अतिशय सुरक्षित ठिकाणी बसलेले असला तरी संकट स्वतःहून आपल्याकडे चालून येतं. अशीच एक घटना आता नांदेडमधून समोर आली आहे.
या घटनेमध्ये एका कार्यक्रमासाठी अनेक लोक जमलेले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी डीजेही लावण्यात आला होता. मात्र, अचानक डीजे लावलेल्या बोलेरो गाडीचे ब्रेक फेल झाले. यानंतर ही गाडी थेट कार्यक्रमासाठी बसलेल्या लोकांच्या अंगावर गेली. गाडी अंगावरुन गेल्याने या घटनेत तब्बल 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात घडली.
advertisement
किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे बंजारा समजाचा तिज महोत्सव सुरू होता. या कार्यक्रमासाठी अनेक लोक जमले होते. तसंच या महोत्सवासाठी डीजेही लावण्यात आला होता. बोलेरो पिकअप गाडीवर हा डीजे होता. मात्र, गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं.
advertisement
चालकाचं नियंत्रण सुटताच ही गाडी कार्यक्रमातील लोकांच्या अंगावर गेली. गाडी अंगावर चढल्याने कार्यक्रमातील लोक जखमी झाले. यात महिला आणि मुलांसह एकूण 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. तर, गंभीर जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मात्र, या घटनेनं कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News: डीजे लावलेल्या गाडीचे ब्रेक अचानक फेल; कार्यक्रमात बसलेल्या 12 लोकांना चिरडलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement