Nanded Hospital Tragedy : 'सीझर सोडून डॉक्टरच्या बर्थडे पार्टीला, उपचाराला विलंब झाल्याने मायलेकराचा मृत्यू' दानवेंचा गंभीर आरोप

Last Updated:

Nanded Hospital Tragedy : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा आपल्या नवजात बालकासह मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
नांदेड, 4 ऑक्टोबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयातील मृत्यूतांडव थांबायचं नाव घेताना दिसत नाही. नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचं सीझर वेळेत न झाल्याने आईसह नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शासकीय रुग्णालयात घडली आहे. सीझर सोडून सर्वजण एका डॉक्टरच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचं वेळेत सीझर न झाल्याने तिचा नवजात बालकासह मृत्यू झाला. ज्या दिवशी महिला प्रसूतीसाठी दाखल झाली, त्यावेळी सीझर सोडून सगळेजण एका डॉक्टरच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. आठ तास उशीरा सीझर झाल्याने महिला आणि बाळाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. नांदेड शहराजवळच्या काकांडी गावातील विजयमाला कदम ह्या बाळंतीण महिलेला प्रसूतीसाठी सायंकाळी सात वाजता दाखल करण्यात आले. पण त्या दिवशी एका डॉक्टरचा वाढदिवस होता. सगळेजण त्या पार्टीला गेले होते. आठ तास उशीरा रात्री तीन वाजता विजयमाला कदम यांचे सीझर झाले. उपचाराला विलंब झाल्याने मायलेकाचा मृत्यू झाला असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
advertisement
त्या दिवशी कदम कुटुंबीयांना बाहेरून 70 हजाराच्या औषधी मागवण्यात आल्या, त्याच्या पावत्या आपल्याकडे असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. त्या दिवशी कोणाचा वाढदिवस होता? कोण कोण पार्टीला गेले होते? याची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी काकांडी येथे जाऊन मयत विजयमाला कदम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आई-लेकाचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला. याबाबत रूग्णालय प्रशासनाकडून कुठलाही खुलासा अजुन करण्यात आला नाही.
advertisement
नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच
विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे. मागील 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात 12 नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 48 तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 31 पर्यंत गेली आहे. या घटनेनंतरही रुग्णालय प्रशासन गाफिल असल्याचे दिसून येत आहे.
advertisement
मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात 30 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 1 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या दीड ते तीन दिवसाच्या नवजात बालकांचा समावेश आहे. यासोबतच सर्प दंश, विष प्राशन आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Hospital Tragedy : 'सीझर सोडून डॉक्टरच्या बर्थडे पार्टीला, उपचाराला विलंब झाल्याने मायलेकराचा मृत्यू' दानवेंचा गंभीर आरोप
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement