Maharashtra politics : मोठी बातमी! काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात? विधानसभेपूर्वी घडामोडींना वेग
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसला विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
नांदेड, मुजीब शेख, प्रतिनिधी : नांदेडमधून मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा जितेश अंतापूरकर यांच्यावर आरोप आहे. त्यातच त्यांनी आता अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
नांदेड जिल्हयातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे आता भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापुरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती देखील खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण आणि अंतापूरकर यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीत देखील अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. शिवाय राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरू झाली आहे. जर अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा काँग्रेससाठी अशोक चव्हाण यांच्यानंतर दुसरा मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
July 22, 2024 11:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Maharashtra politics : मोठी बातमी! काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात? विधानसभेपूर्वी घडामोडींना वेग