Ashok Chavan : मराठा-धनगर आरक्षणाला विरोध असलेलं बनावट लेटरपॅड व्हायरल; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोख चव्हाण यांच्या नावाने बनावट आशय व्हायरल झाल्याने खळबळ.
नांदेड, 25 नोव्हेंबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : राज्यात सध्या मराठा आणि धनगर आरक्षण प्रश्न तापला आहे. एकीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाकडूनही ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. अशात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध असल्याचा आशय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नावाने व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार केली असून हे माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध असल्याचा आशय त्या लेटरपॅडवर असुन ते तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने लिहण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. याबाबत अशोक चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. याआधीही चव्हाणांचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लेटरपॅड वापरून मराठा आरक्षणाविरोधीचे पत्र व्हायरल करण्यात आले होते. याबाबत 20 फेब्रुवारी 2023 रोजी अशोक चव्हाणांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा असाच प्रकार घडला आहे. आपल्या राजकीय विरोधकाकडून हा प्रकार सुरू असून आपल्या विरोधात आणखी काही षडयंत्र रचण्यात आल्याची शक्यता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. आगामी काळात निवडणुका असून गैरसमज निर्माण करून बदनामी करण्याचे हे काम असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
Location :
First Published :
November 25, 2023 3:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Ashok Chavan : मराठा-धनगर आरक्षणाला विरोध असलेलं बनावट लेटरपॅड व्हायरल; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया