वंचितची भूमिका संभ्रम निर्माण करणारी; अशोक चव्हाण म्हणाले, नांदेडमध्ये...
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
वंचित आघाडीने नांदेडमध्ये काँगेस पाठींबा दिला याबाबत अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, मतदारसंघ निहाय पक्षाची भूमिका असू शकत नाही.
मुजीब शेख, नांदेड : नांदेडमध्ये वंचित आघाडीने काँगेसला पाठिंबा दिल्याचा दावा काँगेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी केला. तशी घोषणा आंबेडकर यांनी केल्याचे वसंत चव्हाण म्हणाले. मात्र त्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एका पक्षाला पाठिंबा, तर काही ठिकाणी स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम अवस्था आहे की त्यांची राजकीय भूमिका काय आहे,अशी प्रतिक्रिया भाजप नेते अशोक चव्हाण यांनी दिली. वंचितच्या भूमिकेचा नांदेडमध्ये फरक पडणार नाही असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
वंचित आघाडीने नांदेडमध्ये काँगेस पाठींबा दिला याबाबत अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रीया दिली. मतदारसंघ निहाय पक्षाची भूमिका असू शकत नाही. भूमिका घ्यायची असेल तर संपूर्ण राज्यासाठी भूमिका घ्यावी लागेल असे देखील अशोक चव्हाण म्हणाले. काही मतदारसंघात पाठिंबा काही मतदारसंघात वेगळी भूमिका हे स्पष्टीकरण त्यांनीच द्यावं. नांदेड मध्ये भाजपाला मानणारा वर्ग आहे. तो भाजपाशी कमिटेड आहे. माझ्यासोबत जे काँग्रेस मधून भाजपामध्ये आले ती ही वोट बँक कमिटेड आहे. त्यामुळे नांदेडची निवडणूक मला अडचणीची वाटत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले.
advertisement
दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. याबाबत अशोक चव्हाण यांना विचारले असता निवडणूक आल्यावरती अशा बैठका रॅली होत असतात. खरा संघर्ष जमिनीवर आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी परिस्थिती आहे. देशामध्ये इंडिया दिसत असेल जिल्ह्यामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
advertisement
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही वंचितच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. कोणाला पाठींबा द्यायचा हा त्यांचा विषय. पण एका मतदार संघात पाठींबा आणि दुसऱ्या ठिकाणीं वेगळी भुमिका यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले .
वंचितने पाठिंबा दिला असला तरी नांदेड लोकसभा मतदारसंघात काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे उमेदवार तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. अशोक चव्हाण आणि मी आम्ही दोघी शक्ती एकत्र आल्याने परिणाम होणार नाही असं चिखलीकर म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 31, 2024 3:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
वंचितची भूमिका संभ्रम निर्माण करणारी; अशोक चव्हाण म्हणाले, नांदेडमध्ये...