Nanded News : धक्कादायक! सरकारी रुग्णालयात एका दिवसात 24 मृत्यू, अधिष्ठात्यांनी सांगितलं कारण
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी मृत्यूमागचे कारण सांगताना शासकीय रुग्णालयात औषधांच्या प्रचंड तुटवड्याकडे लक्ष वेधले.
नांदेड, 02 ऑक्टोबर : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. यात तब्बल १२ नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांचा जास्त समावेश होता असा दावा केला. तसंच मृत्यू झालेले रुग्ण गंभीर होते असेही स्पष्टीकरण दिले.
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 70 ते 80 किमी परिसरातील रुग्ण इथं दाखल होतात. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झालाय. यात 12 नवजात बाळांचा आणि 12 इतर रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी माहिती देताना सांगितलं की, मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये साप चावल्याने, विषबाधा झालेल्यांचाही समावेश आहे. रुग्णांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी रुग्णसेवेत फारशी अडचण झालेली नाही.
advertisement
दरम्यान, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी मृत्यूमागचे कारण सांगताना शासकीय रुग्णालयात औषधांच्या प्रचंड तुटवड्याकडे लक्ष वेधले. त्यांनी म्हटलं की, राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. हाफकिनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नसल्याचंही ते म्हणाले.
काही काळात हाफकिन या संस्थेकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडतेय. अशावेळी अत्यवस्थ रुग्ण आणि लहान मुलांचा औषधाअभावी मृत्यू होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2023 4:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News : धक्कादायक! सरकारी रुग्णालयात एका दिवसात 24 मृत्यू, अधिष्ठात्यांनी सांगितलं कारण