दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले! फावडे डोक्यात घालून महिलेसह तरुणाची हत्या, किनवटमध्ये तणाव
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने घरमालकाकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याने त्याचा आणि अन्य एका महिलेचा खून घरमालकाने केला.
मुजीब शेख, नांदेड : किनवटमध्ये घराचं बांदकाम करणाऱ्या मिस्त्रीसह एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावऱण निर्माण झालं आहे. मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने घरमालकाकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याने त्याचा आणि अन्य एका महिलेचा खून घरमालकाने केला अशी फिर्याद मयत युवकाच्या भावाने पोलीसात दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किनवट जवळच्या अंबाडी येथे मिस्त्रीकाम करण्यासाठीं शेख वसीम हा युवक गेला. उत्तम भरणे यांच्या घरी काम सुरू होतं. वसीम याने पिण्यासाठी उत्तम भरणे यांच्याकडे पाणी मागितले. त्यातून वाद होऊन भरणे याने फावड्याने वसिमच्या डोक्यात वार केला यात तो मरण पावला. तेव्हा शेजारील 50 वर्षीय महीला विशाखा मुनेशवर ही भांडण सोडण्यासाठी आली. आरोपी उत्तम भरने याने तिला देखील फावड्याने मारले. उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला असं पोलीस तक्रारीत म्हटल आहे.
advertisement
दरम्यान, या घटनेनंतर गावात वेगवेगळ्या अफवा पसरल्या. जमावाने शेख वसीम याचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. मोठा जमाव यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमला होता. जमावाने दगडफेकही केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किनवट शहरातील दुकाने बंद झाली होती. यावेळी दुसरा गट देखील समोर आला. दोन्ही गटात एकमेकाविरोधात घोषणाबाजी झाली.
advertisement
जळगाव : भुसावळमध्ये दुहेरी हत्याकांड, माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या घालून हत्या
भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करण्यात आलाय. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास धावत्या गाडीवर गोळीबार केले गाला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2024 7:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले! फावडे डोक्यात घालून महिलेसह तरुणाची हत्या, किनवटमध्ये तणाव