फडणवीसांनी अधिवेशनात दिलेल्या 'त्या' उत्तरावर जरांगे थेटच बोलले; म्हणाले 24 डिसेंबरपर्यंत...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत तपासणी करून कार्यवाही केली जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं होतं, आता यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नांदेड, 9 डिसेंबर, मुजीब शेख : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा त्यांच्या काही प्रमुख मागण्यात आहेत. दरम्यान मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये शुक्रवारी लेखी उत्तर दिलं. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत तपासणी करून कार्यवाही केली जाईल असं फडणवीस यांनी आपल्या उत्तरात म्हटलं होतं. यावर आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
'ते विधान बदलतील, नाही तर 24 डिसेंबरपर्यंत पाहू. थोडा धीर धरा अमाचंही बारीक लक्ष आहे.
आमचं बारकाईने लक्ष सरकारकडे आहे. एकट्याच्या दबावाखाली फडणवीस यांनी पडू नये. मराठा काय आहे ते 24 डिसेंबरनंतर कळेल. आमचा संयम तुम्ही पाहत आहात.
गुलाल लावण्याचं आणि गुलाल न पडू देण्याची ताकद मराठ्यात आहे . ते स्टेटमेंट बदलतील, 100 टक्के बदलतील, ते पूर्वीच्या भूमिकेवर येतील, जर नाही बदलले तर 24 डिसेंबरनंतर कळेल.' असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
advertisement
दरम्यान मराठवाड्यात कुणबीच्या नोंदी कमी प्रमाणात आढळून येत आहेत. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नांदेड, संभाजीनगर, लातूर, या जिल्ह्यांत नोंदी कमी आढळून येत आहेत, त्याच कारण अधिकारी लक्ष देत नाहीत.अभ्यासक नाहीयेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलणार' असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
December 09, 2023 12:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
फडणवीसांनी अधिवेशनात दिलेल्या 'त्या' उत्तरावर जरांगे थेटच बोलले; म्हणाले 24 डिसेंबरपर्यंत...