Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडला; गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Last Updated:

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा सध्या राज्यात संवाद दौरा सुरू आहे. जरांगे पाटील रोज वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा समाजाच्या बैठकी घेत आहेत. यातूनच मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची नांदेड मधील एका मंगल कार्यालयात सभा झाली. मात्र, या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाच मार्चपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी तसच आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करण्यास बंदी घातली होती. मनोज जरांगे पाटील यांनी विनापरवानगी सभा घेऊन जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लघन केले. तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपण सुरू ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि श्याम वडजे यांच्या विरोधात कलम 188, 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
advertisement
जरांगे पाटील बिघडवणार लोकसभेचं गणित?
दहा टक्के आरक्षण स्विकारावं म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा मी आहे. म्हणून मला बाजूला करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. मात्र, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सुट्टीच देणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पन्नास ते साठ हजार जण लोकसभेचा फॉर्म टाकू शकतात, आरक्षणाला जो आडवा आला, त्याला आडवा करण्यासाठीच समाजानं हा निर्णय घेतल्याचंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की गावागावातून लोकसभेसाठी उमेदवार उभा करण्याचा मराठा समाजाचा निर्णय आहे. माझा मालक समाज आहे. मी निमित्त म्हणून पुढे काम करत आहे. समाजाचा निर्णय आहे, तो त्यांनी घेतलेला आहे. शेवटी त्यांना अधिकार आहे. सरकार जर अशा पद्धतीने बॅनर लावू देत नाहीत, सभा घेऊ देणार नाहीत, आंदोलन केलं तर गुन्हे दाखल करणार असेल तर निवडणुकीचा कायद्याने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीचे फॉर्म भरणार आहोत. पन्नास ते साठ हजार लोक फॉर्म भरू शकतात, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडला; गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement