loha Agricultural Market Committee : बाजार समिती निवडणुकीत दाजी पडले मेव्हण्यावर भारी! भाजप खासदाराचा शिंदेंकडून पराभव
- Published by:Rahul Punde
Last Updated:
loha Agricultural Market Committee : लोहा बाजार समितीत मेव्हण्यावर दाजी भारी पडले आहे. नांदेड जिल्ह्यातील 5 बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे.
नादेड, 8 ऑक्टोबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर त्यांचे सख्खे दाजी आमदार श्याम सुंदर शिंदे भारी पडले. एकुण 18 जागापैकी 16 जागा जिंकून आमदार शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला. तर स्वतःच्या मतदारसंघात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव झाला. फक्त दोन जागा भाजपाला जिंकता आल्या. दुसरीकडे मुखेड वगळता पाच बाजार समिती निवडणुकीत भाजपाचा धुव्वा उडाला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे
खासदारावर आमदार भारी
या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर मेव्हण्याला हरवण्यासाठी आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी देखील मोठी ताकद लावली होती. शेकाप, काँगेस, उबाठा गट अशी महाविकास आघाडी करुन आमदार शिंदे मैदानात उतरले होते. त्यांनी एक हाथी बाजी मारली. विजयी मिरवणुकीत आमदार शिंदे यांनी अनेकवेळा दंड थोपटले. मी खरा पहिलवान असुन यापुढे कुठलीच निवडणूक खासदार चिखलीकर यांना जिंकू देणार नाही, असे आव्हान आमदार शिंदे यांनी दिले आहे.
advertisement
नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले. त्यात मुखेड वगळता भाजपा, महायुतीचा मोठा पराभव झाला. पाच बाजार समित्यामध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. मुखेडमध्ये 18 पैकी 12 जागा जिंकून भाजपाने बहुमत मिळवलं. उमरीमध्ये 18 पैकी 18 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. बीलोलीत 18 पैकी 17 जागा आघाडी आणि एक जागा भाजपाला मिळाली. कोंडलवाडी येथे देखील 18 पैकी 17 जागा आघाडी आणि एक जागा भाजपान जिंकली. माहुरमध्ये 18 पैकी 14 जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उठाबा गटाच्या आघाडीने जिंकल्या तर 4 जागा भाजपा, अजित पवार गटाने जिंकल्या. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा बाजार समितीत भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा पराभव झाला. चिखलीकर यांचे दाजी आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या नेतृत्वातील आघाडीला 18 पैकी 16 जागा मिळाल्या.
advertisement
निकाल
उमरी - 18 पैकी 18 जागा महावि
बिलोली - 18 पैकी 17 जागा महावि , 1 भाजपा
कोंडलवाडी 18 पैकी 17 जागा महावि , 1 जागा. भाजपा
माहुर - 18 पैकी 14 जागा राष्ट्रवादी उठाबा आघाडी , 4 जागा भाजपा - काँगेस युती
लोहा - 18 पैकी 16 महावि, भाजपा 2
advertisement
मुखेड - 18 पैकी 12 जागा भाजपा महावी 6
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
October 08, 2023 9:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
loha Agricultural Market Committee : बाजार समिती निवडणुकीत दाजी पडले मेव्हण्यावर भारी! भाजप खासदाराचा शिंदेंकडून पराभव