advertisement

Nanded News : '12 फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळाले' नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर खोचक टीका

Last Updated:

Nanded News : आमची सत्ता आल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

News18
News18
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलचं तापलं आहे. '12 फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळाले' अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. 12 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावरून नाना पटोले यांनी टीका केली. मागच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसची एकही जागा नव्हती. पण आता तीनही जागा निवडून आल्या म्हणजे शंभर टक्के परफॉर्मन्स आहे, असे पटोले म्हणाले. जो लॅक्युना होता तो भाजपने नेला. त्यामुळे भाजपाचे धन्यवाद असेही पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री पदाचा त्यांचा चेहरा कोण हे महायुतीने आधी जाहीर करावे : पटोले
मुख्यमंत्री पदाचा महाविकास आघाडीचा चेहरा कोण? असं महायुतीकडून विचारलं जातं. या प्रश्नावर नाना पटोले यांनी त्यांचा चेहरा कोण असा प्रतिसवाल केला आहे. महायुतीचा चेहरा कोण हे जाहीर करा. आपले झाकून ठेवावे आणि दुसऱ्याचे सांगावे असा हा प्रकार असल्याचे पटोले म्हणाले.
advertisement
समृद्धी महामार्ग भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणार : पटोले
शक्तिपीठ महामार्गाला काँग्रेसचा विरोध आहे, असे सांगताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमचं सरकार आल्यावर समृद्धी महामार्ग भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया दिली. समृद्धी महामार्गामुळे यांची समृद्धी झाली आणि लोकांचे नुकसान झाले. आमचं सरकार आल्यावर श्वेतपत्रिका जाहीर करणार, ज्यांनी भ्रष्टाचार केला, महामार्गालगत जमिनी घेतल्या आणि सरकारच्या पैशांची लूट केली त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/नांदेड/
Nanded News : '12 फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळाले' नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर खोचक टीका
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement