नांदेडचा 55 वर्षांचा उपसरपंच झाला हैवान, 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; जन्माला आलेल्या बाळाला विकलं, अन्...
- Published by:Prachi Amale
 
Last Updated:
तामसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली.
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड: जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एका नवजात स्त्री जातीच्या बाळाची पित्याकडून विक्री करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 55 वर्षाच्या उपसरपंचाने 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले, आणि यातून हे बाळ जन्माला आले होते. घटना उघडकीस आल्यानंतर तामसा पोलिसांनी नराधम पित्याला अटक करून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
advertisement
नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली. मागच्या महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. प्रकरण दाबण्यासाठी नवजात अर्भक विकण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तामसा पोलिसानी 55 वर्षीय बाबुराव तुपेकर याला अटक केली, आरोपी हा उपसरपंच आहे.
advertisement
गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार
आरोपीने त्याच गावातील 16 वर्षीय मुलीवर आरोपी बाबुराव तुपेकर याने वर्षभरापूर्वी पाण्यात दारू आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले . त्यानंतर तो उपसरपंच सातत्याने मुलीवर अत्याचार केले, अशी तक्रार पीडित मुलीने दिली. त्यावरून तामसा पोलिसानी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपीने नवजात अर्भक विकल्यची चर्चा
advertisement
अवैध संबंधातून अल्पवतीन मुलगी गरोदर राहिली . मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तीची प्रसूती झाली, तिला मुलगी झाली, मात्र गावात बदनामी होईल म्हणून आरोपीने नवजात अर्भक विकल्यची चर्चा आहे. मात्र याबाबत पोलिसाकडे अधीकृत माहिती नाही . आरोपी बाबुराव तुपेकर याला अटक करण्यात आली . नवजात अर्भकाची विक्री करण्यात आली होती का? तसच प्रकरण मिटवण्यासाठी कोण कोण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
April 15, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
नांदेडचा 55 वर्षांचा उपसरपंच झाला हैवान, 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; जन्माला आलेल्या बाळाला विकलं, अन्...


