Nanded Lok Sabha Election Results : अटीतटीच्या लढतीत कोण मारणार बाजी? नांदेडमधून चव्हाण की चिखलीकर?

Last Updated:

नांदेड लोकसभेसाठी यंदा भाजप आणि काँगेसमध्ये थेट लढत झाली. या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

News18
News18
नांदेड, मुजीब शेख, प्रतिनिधी : नांदेड लोकसभेसाठी यंदा भाजप आणि काँगेसमध्ये थेट लढत झाली. भाजपकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँगेसकडून माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुरुवातीला ही लढत भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. पण नंतर मात्र काँगेसने देखील जोर धरला. आणि शेवटच्या आठवड्यात नांदेड लोकसभेची लढत अत्यंत चुरशीची ठरली. अटीतटीच्या या सामन्यात विजयाचा दावा दोन्ही उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेडचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँगेस सोडून भाजपात प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण आमदार होते. आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्याना राज्यसभा दिली. अर्थात बेरजेचे गणित खेळत भाजपाने अशोक चव्हाण यांना पक्षात घेतले. नांदेडसह मराठवड्यात अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्षाला फायदा होऊ शकतो असं त्यामागचं गणित होतं.
advertisement
दरम्यान यंदाच्या नांदेड लोकसभा निवडणुकीत मराठा आणि मुस्लिम मतांची टक्केवारी वाढल्याचं पाहायला मिळालं . मुस्लिम बाहुल आणि मराठा बहुल गावात मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच काही प्रमाणात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा भाजपला फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Lok Sabha Election Results : अटीतटीच्या लढतीत कोण मारणार बाजी? नांदेडमधून चव्हाण की चिखलीकर?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement