Crime News : अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, नांदेडमध्ये जन्मदात्रीने 25 दिवसांच्या बाळाचा घोटला गळा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Crime News : नांदेड जिल्ह्यात अनैतिक संबंधातून जन्मलेले स्त्री जातीचे 25 दिवसाचे बाळ नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षात अनैतिक संबंधाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दिवसेंदिवस नात्यांमधील विश्वास हरवत चालल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अनैतिक संबंधाचा शेवटही तितकाच वाईट होतो. अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आले. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात उघडकीस आली.
काय आहे प्रकरण?
एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे सूत जुळाले. या संबंधातून तिला मुलगी झाली. या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे याच्या घरचे भांडण करत होते. त्यातून शेषराव भुरे याने मुलीचा गळा आवळून खून केला. त्यांनतर मुलीचे प्रेत एका पिशवीत टाकून नदीत फेकून दिले. याबाबत माहिती मिळाल्यावर प्रेत बाहेर काढले. आरोपी महिला आणि शेषराव भुरे दोघांना देगलुर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
August 05, 2024 7:36 PM IST
मराठी बातम्या/नांदेड/
Crime News : अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, नांदेडमध्ये जन्मदात्रीने 25 दिवसांच्या बाळाचा घोटला गळा