कुत्रं म्हशीला चावलं अन् इंजेक्शन आख्ख्या गावाला, नांदेडमधील विचित्र घटना वाचून चक्रवाल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका म्हशीला कुत्रं चावल्याने आख्ख्या गावाला इंजेक्शन द्यावं लागलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका म्हशीला कुत्रं चावल्याने आख्ख्या गावाला इंजेक्शन द्यावं लागलं आहे. कुत्र चावून म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित गाव भयभयीत झालं होतं. यानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणेला गावात पाचारण करण्यात आलं. गावातील अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना इंजेक्शन द्यावं लागलं.
नेमकं प्रकार काय घडला?
मुखेड तालुक्यातील एका गावात राहणारे किसन इंगळे यांची म्हैस मागील महिनाभरापासून आजारी होती. तिला काय झालं, याबाबत कुणाला काहीच समजत नव्हतं. दरम्यान इंगळे यांनी या म्हशीचं दूध नेहमीप्रमाणे गावकऱ्यांना विकलं होतं. यातून गावातील लहान थोरापासून अनेकांनी या म्हशीचं दूध किंवा या म्हशीच्या दूधापासून बनवलेले विविध पदार्थ खाल्ले होते. पण अलीकडेच या म्हशीचा मृत्यू झाला.
advertisement
या म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित म्हशीला कुत्र्याने चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा सुरू झाली. जेव्हा या म्हशीच्या मालकाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ही म्हैस दाखवली, तेव्हा तिच्यात रेबीज सदृश्य लक्षणं दिसून आली. यामुळे रेबीज झालेल्या म्हशीचं दूध प्यायल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेने गावातील तब्बल १८० जणांना रेबीजचं इंजेक्शन दिलं आहे.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
August 08, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
कुत्रं म्हशीला चावलं अन् इंजेक्शन आख्ख्या गावाला, नांदेडमधील विचित्र घटना वाचून चक्रवाल


