Nanded News : नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शहरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
नांदेड, 27 ऑक्टोबर, मुजीब शेख : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शहरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. नगीनाघाट परिसरात शुक्रवारी हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये 21 तलवारी आणि 11 खंजरांचा समावेश आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पंजाब राज्यातील दर्शनसिंग हा व्यक्ती अवैधरित्या तलवार आणि खंजर विक्री करीत असल्याची माहिती नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी पोहोचून दर्शनसिंग याला ताब्यात घेतलं. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 21 तलवारी आणि 11 खंजर आढळून आले. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला असून, त्याला अटक केली आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दर्शनसिंंग याच्याकडून पोलिसांनी 21 तलवारी आणि 11 खंजर जप्त केले आहेत. पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शहरातील नगीनाघाट परिसरात ही कारवाई केली. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
October 27, 2023 2:42 PM IST