advertisement

नांदेडमध्ये कैद्याचं शेजाऱ्याशी भांडण; पोलिसांचा गोळीबार, शेजाऱ्याच्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू

Last Updated:

नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
नांदेड, 17 डिसेंबर, मुजीब शेख : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पॅरोलवर बाहेर असलेल्या आरोपीचं त्याच्या शेजाऱ्याशी भांडण झालं. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्याच्या भावाच्या मागे आरोपी तलवार घेऊन लागला. पळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं शेजाऱ्याच्या भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना नांदेडमध्ये घडली आहे. आरोपी शेरसिंघ गिल हा खून प्रकरणात पॅरोलवर बाहेर आला होता. शेजारी असलेल्या हरदिपसिंघ पाठी यांच्या भावासोबत आरोपीचे काही कारणाने भांडण झालं. भांडण सोडवण्यासाठी हरदिपसिंघ पाठी गेले असता त्यांच्या मागे आरोपी हा तलवार घेऊन लागला. पळत असताना हरदिपसिंघ खाली पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू  झाला.
advertisement
दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलीस आले असता आरोपीने गॅस सिलेंडर पेटवण्याची धमकी दिली. तसेच आरोपी पोलिसांवर तलवार उगारत होता. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी त्याच्या पायाच्या दिशेनं चार ते पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये दोन गोळ्या आरोपीच्या पायाला लागल्यामुळे तो जखमी झाला आणि पोलिसांनी त्याला पकडलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
नांदेडमध्ये कैद्याचं शेजाऱ्याशी भांडण; पोलिसांचा गोळीबार, शेजाऱ्याच्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement