'बहिणीचा नाद सोड', प्रेमाच्या संशयातून भावाने तरुणाचा चिरला गळा, नांदेडला हादरवणारी घटना!

Last Updated:

Crime in Nanded: नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं धारदार चाकुने मानेवर आणि गळ्यावर वार करत तरुणाचा जीव घेतला आहे. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला अटक केली आहे.
ही घटना सोमवारी रात्री शेळगाव येथील ग्रामपंचायत परिसरात घडली. संतोष माटलवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयत संतोष माटलवार हा त्याचा भाऊ आणि मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्याचवेळी गावातीलच एक अल्पवयीन मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने संतोषला 'तू माझ्या बहिणीच्या पाठीमागे लागू नकोस,' अशी धमकी दिली. यावेळी संतोषने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला.
advertisement
हा वाद वाढत गेल्यानंतर चिडलेल्या आरोपीने आपल्याजवळील धारदार चाकूने संतोष माटलवारच्या गळ्यावर आणि पाठीवर प्राणघातक वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संतोष रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या भावाने आणि मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर संतोषला मृत घोषित केले.
सुरुवातीला किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे वाटले, परंतु मयत संतोषच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून या हत्येमागे बहिणीची छेडछाड केल्याचं कारण असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर गुन्ह्याची नोंद देगलूर पोलिसांनी घेतली असून, त्यांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली आणि हत्येचा आरोप असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
'बहिणीचा नाद सोड', प्रेमाच्या संशयातून भावाने तरुणाचा चिरला गळा, नांदेडला हादरवणारी घटना!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement