Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Satej Patil BJP : एका बाजूला हिंगोलीत काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर परिणाम होणार असून दुसरीकडे विधान परिषदेतील समीकरणेदेखील बदलणार आहेत. काँग्रेसचे नेते सतेज पाटलांसाठी हा मोठा धक्का आहे.
मुंबई : काँग्रेस नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज सकाळीच त्यांनी आपल्या विधान परिषद आमदारकीचा राजीनामा विधिमंडळाच्या सचिवांकडे सुपूर्द केला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सातव यांनी केलेला प्रवेश हा काँग्रेससाठी दुहेरी धक्का मानला जात आहे. एका बाजूला हिंगोलीत काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर परिणाम होणार असून दुसरीकडे विधान परिषदेतील समीकरणेदेखील बदलणार आहेत. काँग्रेसचे नेते सतेज पाटलांसाठी हा मोठा धक्का आहे.
प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा २०३० पर्यंतचा कार्यकाळ होता. मात्र, भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सातव यांच्या राजीनाम्याने विधान परिषदेतून काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी झाले आहे.
भाजपकडून एका दगडात दोन पक्षी!
राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत सध्या विरोधी पक्षनेता नाही. विधानसभेत संख्याबळाचं कारण समोर करत विरोधी पक्षनेता पद नाकारलं जात असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांनी विधीमंडळ नियमांचा दाखला देत विरोधी पक्षनेते पदासाठी कोणत्याही संख्येची अट नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, विधान परिषदेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ते सभागृहातून निवृत्त झाले आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे.
advertisement
काँग्रेस विधीमंडळ पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचे नावाची शिफारस केली आहे. मात्र, सातव यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसची सदस्यसंख्या कमी झाली आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची विधान परिषदेची सदस्यसंख्या देखील सहा झाली आहे.
विधान परिषदेत ७८ सदस्य आहेत. त्यामुळे १० टक्के सदस्य संख्येचा निकष लावल्यास विरोधी पक्षनेते पदाचा दावा करणाऱ्या पक्षाकडे किमान ७ सदस्य असणं आवश्यक आहे. सातव यांच्या राजीनाम्याने काँग्रेसची संख्या आता ६ वर आली आहे. मात्र, विधान परिषदेतील २२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या २२ जागा कमी केल्यास काँग्रेसचे सतेज पाटील हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात. आगामी महापालिकांच्या निवडणूक निकालानंतर काही महिन्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत विधान परिषद ही विरोधी पक्षनेत्याशिवाय राहण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 3:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन










