Uddhav Thackeray : घरात काम करणाऱ्यांनाही....; पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून उद्धव ठाकरेंची टीका

Last Updated:

पार्थ पवार यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा आणि सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
मुजीब शेख, नांदेड : उद्धव ठाकरे हे भोकर दौऱ्यावर असून पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे माजी खासदार शिवाजीराव कांबळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, 'मविआचे नांदेडचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासाठी सभा घ्यायची होती . पण शक्य झालं नाही . माझे शिवसैनिक चव्हाण यांच्यासाठी मेहनत करतील.'
पार्थ पवार यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा आणि सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, घरात काम करणाऱ्यांनाही झेड सुरक्षा दिली. सलमान खानच्या घरासमोर गोळीबार होतो. गद्दारांना सुरक्षा आहे पण सर्वसामान्य लोकांना सुरक्षा नाही.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना गद्दारी झाली नसती तर सरकारने खूप कामे केली असती. आता आम्ही सर्व मिळून पहिल्यांदा निवडणुक लढवत आहोत आणि सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत आमचे सर्व खासदार निवडून येतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
advertisement
मला अडीच वर्षात मित्र पक्षाने मदत केली. मधल्या काळात गद्दारी झाली. आता एकत्र येऊन निवडणूक लढत आहोत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. मित्र पक्षाचे कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. एवढी एकजूट पाहता विजयी निश्चित आहे.  हुकूमशाही विरोधात शेतकरी वर्गात मोठा रोष आहे. महाविकास आघाडीने कर्ज मुक्त केले होते असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
शिवसेनेच्या 7/12 वर गद्दारांनी नाव लिहिलं. उद्या आमच्या नावावर देखील नाव लिहितील. सुरतेत एक जादू झाली आणि यांचा उमेदवार बिनविरोध झाला. घटना बदलण्याची भीती, संसदेतील 150 खासदार त्यांनी निलंबित केले होते. अशोक चव्हाण गेल्यावर अनेकजण काँग्रेसमध्ये येत आहेत, सुभेदारी मोडून पडली, लोक मोठी झाली की गद्दार होतात पण जनता गद्दार होत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Uddhav Thackeray : घरात काम करणाऱ्यांनाही....; पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून उद्धव ठाकरेंची टीका
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement