धक्कादायक! नांदेडमध्ये हजार भाविकांना प्रसादातून विषबाधा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
विषबाधा झाल्याची माहिती मिळताच तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुजिब शेख, प्रतिनिधी नांदेड : राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी परभणीमध्ये भगरमधून आणि आता नांदेडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मोठी विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. विषबाधा झाल्याची माहिती मिळताच तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी गावात जवळपास एक हजार लोकांना विषबाधा झाली आहे. संत बाळूमामा यांचा धार्मिक कार्यक्रमांमध्ये भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झालेली आहे. बाधित लोकांना लोहा शासकीय आणि खासगी, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीपासून मिळेल त्या वाहनाने रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे . सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
परभणी तालुक्यातील माळसोन्नामध्ये भगर खाल्ल्यानं शंभरहून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामूळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. साधारण शंभरहून अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
advertisement
परभणी तालुक्यातील सोन्ना या गावांमध्ये सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यात आज एकादशीनिमित्त, भाविकांसाठी भगरीचा प्रसाद तयार करण्याचा होता. या भगरीमुळे या या भाविकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विषबाधा झालेल्या भाविकांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये या रुग्णांची मोठी गर्दी झाल्यामुळे सोयीसुविधांची कमतरता जाणवत आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
February 07, 2024 8:59 AM IST