नांदेडच्या विद्यार्थ्याची करामत; परीक्षेत उत्तरपत्रिकेलाच चिटकवल्या 500 च्या नोटा, कारण विचारताच धक्कादायक खुलासा!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नांदेडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणामुळं खळबळ उडाली आहे.
नादेड, 8 सप्टेंबर, मुजीब शेख : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेकजण परीक्षेत पास होण्यासाठी विविध युक्त्या लढवत असतात. यातून कॉपीचे भन्नाट आणि माहित नसलेले प्रकार समोर येतात. कॉपी करताना पकडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील होते. मात्र नांदेडमध्ये विद्यार्थ्यानं परीक्षेत जे काही केलं आहे, ते पाहून पोलीस आणि शिक्षकही चक्रावून गेले आहेत. हा विद्यार्थी नांदेडमध्ये बीसीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत 1843 विद्यार्थी कॉपी करतांना आढळले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांवर विद्यापीठानं कारवाई करत त्यांची संपादनुक रद्द केली. एका विद्यार्थ्यानं तर हद्दच केली आहे. त्याने उत्तर पत्रिकांवर पाचशेच्या नोटा चिटकवल्या आहेत. त्याच्यावर पुढील चार परीक्षेंसाठी बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील बीसीए प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं सर्व सात विषयांच्या उत्तर पत्रिकेवर पाचशेच्या नोटा चिटकवल्या. पास करण्याच्या उद्देशानं त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्याला बोलावून त्याची चौकशी करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबुल देखील केला आहे. या विद्यार्थ्यावर विद्यापीठाकडून कारवाई करण्यात आली असून, त्याची संपादनुक रद्द करण्यात आली आहे, त्याच्यावर पुढील चार परीक्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
September 08, 2023 2:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
नांदेडच्या विद्यार्थ्याची करामत; परीक्षेत उत्तरपत्रिकेलाच चिटकवल्या 500 च्या नोटा, कारण विचारताच धक्कादायक खुलासा!