पोलिसांनी दिवसभर चोपला, खरातने मान टाकली, शक्तिहीन झालेल्या कॅप्टनची बेक्कार अवस्था, अटकेनंतरचा पहिला Video
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ashok Kharat First Video: गेल्या तीन दिवसांपासून अशोक खरात याची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. आज अज्ञात स्थळी नेऊन पोलिसांनी खरातची चौकशी केली.
नाशिक: कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाने मिरगावात महादेवाचे मंदिर बांधून दर्शनाला श्रीमंत भक्तांना बोलावून त्यांच्या शंकांचं निरसन करून देतो, असे भासवून त्यांच्याकडून लाखो रुपये उळकले. तसेच शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केवळ श्रीमंत भक्तांनाच तो वेळ देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अशोक खरात याचा पहिला व्हिडीओ समोर आला असून खाकीच्या प्रसादानंतर त्याला चालताही येत नव्हते. माझ्यात आता ताकद उरली नाहीये, अशी विनवणी तो पोलिसांना करीत होता.
महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. आज अज्ञात स्थळी नेऊन खरातची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत खरातकडून त्याची गु्न्हा करण्याची मोडस ऑपरेंडी, किती महिलांवर त्याने अत्याचार केला आहे, त्याची संपत्ती कुठे कुठे आहे? अशा मुद्द्यांवर चौकशी झाल्याचे कळते. दरम्यान चौकशी संपल्यानंतर पोलीस घेऊन जात असताना त्याची अवस्था अतिशय वाईट दिसत होती.
advertisement
शक्तिहीन झालेल्या कॅप्टन खरातची बेक्कार अवस्था, अटकेनंतरचा पहिला Video
अनेक मुद्द्यांना विचारलेल्या प्रश्नांवर कॅप्टन खरात केवळ मान हलवत होता. त्यावर त्याला बोलते करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्याचा थंड प्रतिसाद पाहून पोलिसांनी 'ताकदवान बाबाला' काठीचा प्रसाद दिल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी तब्बल सात तास विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी झाल्याचे कळते. पोलीस त्याला पुन्हा तुरुंगाकडे घेऊन जात असताना त्याने मान टाकली होती. माध्यमांच्या कॅमेरासमोर तोंड दिसणार नाही, अशा पद्धतीने तो काळजी घेत होता. माझ्यात आता शक्ती राहिली नाही, असे तो पोलिसांना सांगत होता. त्यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, अशा घोषणा त्याने पोलिसांसमोर दिल्या. अशाच घोषणा पुन्हा देण्याचे पोलिसांनी सांगितल्यावर माझ्यात शक्तीच राहिली नाही, असे केविलवाणे तोंड करून खरात पोलिसांना विनवणी करीत होता.
advertisement
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-22-at-8.43.13-PM-2026-03-e9a460efd0f7e5a2e3e2c40242ea72e2.mp4"][/video]
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक पोलिसांचा पॅटर्न चर्चेत
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा नाशिक पोलिसांचा पॅटर्न राज्यभर गाजला आहे. अनेक गुंड आणि भाईंना पोलिसांनी अटक केल्यानंतर आणि खाकीचा प्रसाद दिल्यानंतर आरोपींकडून
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी घोषणा वदवून घेतात. हीच घोषणा अल्पावधीत राज्यात लोकप्रिय झाली. नाशिक पोलिसांच्या पॅटर्नने गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 9:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसांनी दिवसभर चोपला, खरातने मान टाकली, शक्तिहीन झालेल्या कॅप्टनची बेक्कार अवस्था, अटकेनंतरचा पहिला Video









