Water Cut in Nashik: नाशिकवर पाणीसंकट! 48 तास या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

Last Updated:

नाशिकमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे 6 आणि 7 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा खंडीत होणार आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

News18
News18
नाशिक, प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ: पावसानं उसंत घेतली आणि उकाड्याने हैराण केलं. त्याच बरोबर एक नवीन संकट आलं ते म्हणजे पाण्याचं. नाशिककरांना आता पाणीबाणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. आज आणि उद्या म्हणजेच 6 आणि 7 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा खंडीत होणार आहे. त्यामुळे लोकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे नाशिक शहरातील काही भागांमध्ये आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
आज शहरातील उंटवाडी आणि सिडको परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, उद्या म्हसरूळ परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले जाणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे. पाणीकपातीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी पाण्याची योग्य साठवणूक करावी.
पवन नगर जलकुंभावकडे जाणारी 600 मिमी व्यासाची रायथान मेन उंचवडी पुलाजवळ दुरुस्ती मोठ्या प्रमाणात लिकेज झाली असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचे काम होणं आवश्यक आहे. बुधवारी हे काम हाती घेण्यात येत आहे. सकाळी10:00 वाजता पासून संध्याकाळी पर्यंत पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच गुरुवार दिनांक 7/08/2025 सकाळपासून साजला पाणी पुरवठा कमी दाबाने येणार आहे तरी सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही नम्र विनंती.
advertisement
एसएस व गोरक्षनाथ जलकुंभांमधून होणारा प्रभाव 5.01 महिले डिव्हिजन परिसरात भागात म्हणजे सावरकर नगर, टाकळी, एकलहरा, कालाराम, रामकुंड, विश्रामबाग, पोलिस कॉलनी, गंगापूरनगर, सावरकर, राजमाता गृहसंकुल सावरकर चौक ते देवळाली परिसर, विनायक नगर, ममुर स्वामी परिसर, उपमीन माता मंदिर परिसर, गोरक्षण इत्यादी परिसरांतील पाणी पुरवठा 8 तारखेला कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे पाणी साठवून ठेवावे असं आवाहन केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Water Cut in Nashik: नाशिकवर पाणीसंकट! 48 तास या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement