नवाब मलिक अजितदादांना पाठिंबा देणार? भुजबळांच्या सूचक वक्तव्यानंतर चर्चेला उधाण
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत भुजबळांनी सूचक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
नाशिक, 22 ऑगस्ट, लक्ष्मण घाटोळ : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवाब मलिक बाहेर येताच अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नवाब मलिक यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मलिक हे कोणाला पाठिंबा देणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार की उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र मलिक यांनी सध्या तरी तटस्थ भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
याबाबत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांना सगळेच पाठिंबा देतात असं त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्याबाबत भुजबळांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे आता नवाब मलिक हे अजित पवार यांना पाठिंबा देणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
कांद्यावरून केंद्रावर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. ज्यावेळी भाव नसल्यानं कांदा सतत फेकून द्यावा लागतो, तेव्हा सरकार पैसे देतं का? मग आता जर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील तर सरकारनं आड येऊ नये. काल बाजार समित्या बंद झाल्या होत्या. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
Location :
Nashik,Nashik,Maharashtra
First Published :
Aug 22, 2023 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नवाब मलिक अजितदादांना पाठिंबा देणार? भुजबळांच्या सूचक वक्तव्यानंतर चर्चेला उधाण









