Nashik News: नाशिककर महत्त्वाची बातमी, तिसऱ्या सोमवारी वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
येत्या 11 ऑगस्ट रोजी श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिक: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं 'त्र्यंबकेश्वर' ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. या ज्योतिर्लिंगामुळे नाशिकला मोठे धार्मिक महत्त्व मिळालं आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. सध्या श्रावण हा पवित्र महिना सुरू असून या महिन्यात नाशिकमध्ये येणाऱ्या शिव भक्तांची संख्या आणखी वाढते. येत्या 11 ऑगस्ट रोजी श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने सीबीएस परिसरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. पोलीस उपायुक्त खांडवी यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकमधील ठक्कर बझार बस स्टॅण्डवर भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रविवारी (10 ऑगस्ट) दुपारी 2 वाजेपासून ते सोमवारी (11 ऑगस्ट) रात्री 8 वाजेपर्यंत मेळा बस स्टॅण्ड ते मनसे कार्यालय हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या काळात प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
advertisement
पर्यायी मार्ग
तालुका पोलीस स्टेशन ते ठक्कर बझारकडे जाणारी वाहने सीबीएस सिग्नल-मोडक सिग्नलहून इतरत्र जातील. ठक्कर बझार- सीबीएसकडे येणारी वाहतूक मोडक सिग्नलमार्गे येईल.
दरवर्षी श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये देशभरातून भाविक येतात. त्यामुळे अनेकदा वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे भाविकांसोबतच स्थानिक नागरिकांचीही गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने यावर्षी अगोदरच उपाययोजना सुरू केल्या आहेत.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 09, 2025 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिककर महत्त्वाची बातमी, तिसऱ्या सोमवारी वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग


