मोठी बातमी! नाशिकमध्ये शिवसेना शिंदे, ठाकरे गटामध्ये जोरदार राडा, Video

Last Updated:

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.

News18
News18
नाशिक, लक्ष्मण घाटोळ प्रतिनिधी :  नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विधान परिषद शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना दोन गटात जोरदार राडा झाला.
नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप गुळवे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. याचदरम्यान शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे देखील या ठिकाणी दाखल झाले. किशोर दराडे यांच्यासोबत मंत्री दादा भूसे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि विजय करंजकर हे देखील होते. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोरदार राडा झाला.
advertisement
संदीप गुळवे यांनी नुकताच काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे किशोर दराडे यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचदरम्यान हा राडा झाला. यामुळे ही निवडणूक आता चांगलीच चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
मोठी बातमी! नाशिकमध्ये शिवसेना शिंदे, ठाकरे गटामध्ये जोरदार राडा, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement