आव्हाडांची भावना चांगली, मनुस्मृतीचा अभ्यासात चंचूप्रवेश नको, केसरकर...; भुजबळांनी दिला घरचा आहेर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भाजपकडून आव्हाडांविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येतंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीतील घटक पक्षांनाच घरचा आहेर दिला आहे.
लक्ष्मण घाटोळ, नाशिक : राष्ट्रीय शैक्षिणक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केलं. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडल्यानं नवा वाद उफाळून आला आहे. याविरोधात भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येतंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीतील घटक पक्षांनाच घरचा आहेर दिला आहे. भुजबळ म्हणाले की, मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको. दीपक केसरकर याची भलाभण करतात मला विशेष वाटलं.
छगन भुजबळ म्हणाले की, एकतर मनुस्मृतीला सगळ्यांचा विरोध आहे. महिलांच्याबाबत घाणेरडे लिखाण आहे. त्यांना शिक्षणाचे अधिकार नाही. खूप काही लिखाण आहे. त्यात मराठी अनुवाद सुद्धा आहे. त्यात वाचा काय लिहिलेलं आहे. त्याचातुन स्पष्ट दिसत आहे. 14 महापंडीतांनी त्यावर टीका केली आहे. अनेक लेखकांनी निषेध केला आहे.
advertisement
अचानक हे सगळं कसं आलं. अभ्यासात मनुस्मृतीचा चंचूप्रवेश कशाला पाहिजे? जी लोकांना नको आहे. याच्या पाठीमागे काय चाललंय हे शोधलं पाहिजे. बहुजन मंत्री दीपक केसरकर याची भलाभल करतात मला विशेष वाटलं. पण आम्ही त्याचा विरोध करु असं भुजबळांनी स्पष्ट केलं.
जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केलं तेव्हा त्यांच्याकडून झालेल्या कृतीवर भुजबळ यांनी म्हटलं की, त्यांची भावना चांगली होती. चुकून त्यांनी बाबासाहेब यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले. सगळ्यांनी त्याचे अनुकरण केले पण त्यांनी माफी मागितली. विरोधी पक्षाचे आहे म्हणून टीका करणार असे नाही.
advertisement
मनुस्मृतीवरील फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड आव्हाड करू नका. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको. आव्हाड चुकले असेल म्हणून भाजपने आंदोलन केलं असेल. फडणवीस सुद्धा म्हणाले शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश होणार नाही. ते म्हणाले तसे ते वागतील अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2024 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
आव्हाडांची भावना चांगली, मनुस्मृतीचा अभ्यासात चंचूप्रवेश नको, केसरकर...; भुजबळांनी दिला घरचा आहेर


