Nashik : लेझर लाइट शोमुळे डोळे गमावण्याची वेळ, 6 तरुणांच्या डोळ्यांना दिसेना; डॉक्टर काय म्हणाले?
- Published by:Suraj Yadav
 
Last Updated:
तरुणांच्या डोळ्यांच्या तपासण्या केल्यानंतर डोळ्याच्या अंतर्गत भागात गंभीर इजा झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे तरुणांची पाहण्याची क्षमता अत्यंत कमी झाली आहे.
नाशिक, लक्ष्मण घाटोळ, 02 ऑक्टोबर : डीजेच्या आवाजामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी तरुणांचे मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत. दरम्यान, आता लेझर शोमुळे तरुणांवर डोळे गमावण्याची वेळ आल्याचे प्रकारही समोर येत आहेत. नाशिकमध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आलीय. नेत्ररोग तज्ज्ञांनी या प्रकारावर चिंता व्यक्त करत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलंय. तरुणांच्या डोळ्यांच्या तपासण्या केल्यानंतर डोळ्याच्या अंतर्गत भागात गंभीर इजा झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे तरुणांची पाहण्याची क्षमता अत्यंत कमी झाली आहे.
नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सचिन कासलीवाल यांनी सांगितले की, अचानक तीन ते चार रुग्ण डोळ्यांना नजर कमी झाल्याची तक्रार घेऊन आले. त्यांची तपासणी केली असता बाहेरून त्यांना काहीच त्रास नव्हता. पण डोळ्याचा अंतर्गत भाग ज्याला रेटिना म्हणतात त्याला गंभीर इजा झाली होती. त्यांनी स्फोट किंवा वेल्डिंगचं काम पाहिलं का असं विचारलं. त्यावर त्यांनी लेझर लाइटचे शो पाहिले असल्याचं सांगितलं. याचं गांभीर्य लक्षात येताच असोसिएशनमध्ये चौकशी केली तर तिथेही तीन रुग्ण आढळून आले.
advertisement
रेटिना तज्ज्ञ गणेश भांबरे यांनी तरुणांच्या इतर तपासण्या करुन घेतल्या. तेव्हा तरुणांच्या डोळ्यातील रेटिनामध्ये गंभीर नुकसान झालं असल्याचं निदान झालं. आता त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. लेजर किरणांचे व्हेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी ही मॅच झाल्याने रेटिनावर गंभीर स्वरुपाचे परिणाम झाले असण्याची शक्यता आहे.
दृष्टीवर काय परिणाम झाला हे विचारले असता डॉक्टरांनी सांगितले की, लेझर किरण किंवा उच्च प्रतिचे लाइट डोळ्यातील रेटिनावर पडले. रेटिनामध्ये मॅक्युला नावाचा भाग असतो. त्या भागात जखम होऊन रक्तस्राव झाला. त्या भागाचं काहींचे कायमस्वरुपी नुकसान झालं आहे. परिणामी, डोळ्याची पाहण्याची क्षमता कमी झाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2023 2:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik : लेझर लाइट शोमुळे डोळे गमावण्याची वेळ, 6 तरुणांच्या डोळ्यांना दिसेना; डॉक्टर काय म्हणाले?


