निवृत्तीनाथ महाराज याग उत्सवासाठी एसटी सज्ज, दर 15 मिनिटांनी थेट बस, मार्ग आणि तिकीट दर
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nashik News: वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान निवृत्तीनाथ महाराज यांच्या याग उत्सवाला राज्यभरातून भाविक येतात. त्यासाठी एसटी महामंडळाने खास नियोजन केले आहे.
नाशिक: वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा याग उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 13 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत उत्साहात साजरा होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी, 14 जानेवारी रोजी आहे. या दिवशी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 'एसटी' महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवरून दर 15 मिनिटांनी बस उपलब्ध असेल.
230 जादा बसेसचे नियोजन
गर्दी टाळण्यासाठी आणि भाविकांचा वेळ वाचवण्यासाठी जिल्ह्यातील विविध मार्गांवरून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातून 230 जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमुख बस स्थानकांवरून दर 15 मिनिटांना बस उपलब्ध असणार आहे.
advertisement
प्रमुख मार्ग आणि सुधारित तिकीट दर पत्रक
प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांचे अंतर आणि त्यांचे निश्चित केलेले भाडे पुढीलप्रमाणे आहे. या यात्रेसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा मार्ग 28.3 किलोमीटर अंतराचा असून प्रौढ प्रवाशांसाठी 51 रुपये व मुलांसाठी 26 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
सिन्नर-नाशिक-त्र्यंबकेश्वर या मार्गावर 59.3 किलोमीटर अंतर असून प्रौढांसाठी 102 रुपये व मुलांसाठी 51 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.
advertisement
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर-नाशिक या 73.5 किलोमीटर अंतराच्या मार्गावर प्रौढ भाडे 132 रुपये तर मुलांचे भाडे 66 रुपये असेल.
इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मार्गे देवगाव या 74.5 किलोमीटर अंतराच्या मार्गावरही प्रौढांसाठी 132 रुपये व मुलांसाठी 66 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिक हा मार्ग 61 किलोमीटर अंतराचा असून प्रौढ भाडे 122 रुपये व मुलांचे भाडे 61 रुपये राहील.
advertisement
पिंपळगाव-त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिक या 60.3 किलोमीटर अंतराच्या मार्गावरही प्रौढांसाठी 122 रुपये व मुलांसाठी 61 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, यात्रेच्या काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत बसस्थानकांवरूनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 11:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
निवृत्तीनाथ महाराज याग उत्सवासाठी एसटी सज्ज, दर 15 मिनिटांनी थेट बस, मार्ग आणि तिकीट दर










